लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : राज्य शासनाने राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांना खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत; मात्र नरखेड तालुक्यातील ७५ टक्के पेरणी पूर्णत्वास आली असताना तालुक्यातील विविध बँकांनी शुक्रवार (दि. १८)पर्यंत केवळ ३० टक्के कर्जवाटप केले हाेते. यावरून पीककर्ज वाटपातील बँकांची उदासीनता स्पष्ट हाेते.
तालुक्यातील राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांना १०१.४७ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले हाेते. नरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे उद्दिष्ट ५०४.२० काेटी रुपये, अलाहाबाद बँके ९१६.७० काेटी रुपये, युनियन बँकेचे ६३८.७० काेटी रुपये, बँक ऑफ इंडियाचे ४६९.२० काेटी रुपये, भारतीय स्टेट बँकेचे ६०६.९० काेटी रुपये, मोवाड येथील बँक ऑफ इंडियाचे ५८५.३० काेटी रुपये सावरगाव येथील बँक ऑफ इंडियाचे ५८६.१० काेटी रुपये, बँक ऑफ बडोदाचे ७२६.८० काेटी रुपये, भारसिंगी येथील बँक ऑफ इंडियाचे ६५१.५० काेटी रुपये, जलालखेडा येथील भारतीय स्टेट बँकेचे ८०५.१० रुपये, थडीपवनी येथील भारतीय स्टेट बँकेचे ८६७.१० काेटी रुपये, लाेहारीसावंगा येथील भारतीय स्टेट बँकेचे ७२२.३० रुपये, बेलाेना येथील विदर्भ काेकण ग्रामीण बँकेचे १३६.२० काेटी रुपये, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नरखेड, मोवाड, सावरगाव, पिपळा (केवळराम), जलालखेडा, लोहारीसांवगा व थडीपवनी या शाखांना १,९३०.३९ काेटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले हाेते.
माेवाड येथील नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ७० टक्के उद्दीष्ट गाठले असून, भारसिंगी येथील येथील बँक ऑफ इंडियाने ५४ टक्के, सावरगाव येथील बँक ऑफ बडोदाने आठ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. तालुक्यातील १२९ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाची प्रकिया पूर्ण झाली आहे. बँक ऑफ अलाहाबाद नरखेड, बँक ऑफ इंडिया नरखेड, भारतीय स्टेट बँक जलालखेडा, भारतीय स्टेट बॅँक लोहारीसांवगाने ३६ ते ४० टक्के, बॅंक ऑफ महाराष्ट्र नरखेड, भारतीय स्टेट बंक थडीपवनी व जिल्हा सहकारी बँक नरखेडने ३१ ते ३५ टक्के, युनियन बँक नरखेड, बँक ऑफ इंडिया मोवाड, बँक ऑफ इंडिया सावरगाव, जिल्हा सहकारी बँक मोवाड, सावरगाव व थडीपवनी यांनी २१ ते ३० टक्के, बँक ऑफ इंडिया भारसिंगी, भारतीय स्टेट बँक नरखेड, बँक ऑफ बडोदा सावरगाव, जिल्हा सहकारी बँक जलालखेडा व लोहारीसावंगा यांनी ५ ते २० टक्के कर्जवाटप केले आहे.
...
आढावा बैठकीत निर्देश
राष्ट्रीयीकृत व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या सर्व शाखांनी ११ जूनपर्यंत त्यांच्या एकूण उद्दिष्टांच्या २७ टक्के पीक कर्जाचे वाटप केले हाेते. त्यामुळे हा मुद्दा नरखेड पंचायत समितीच्या सभागृहातील आढावा बैठकीत उपस्थित करण्यात आला हाेता. या बैठकीत माजी गृहमंत्री तथा आमदार अनिल देशमुख व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बँकांना पीककर्ज वाटपाचे उिद्ष्ट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानंतर केवळ तीन टक्के वाटप करण्यात आले.