लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो बौद्ध -आंबेडकरी अनुयायी येतात. देशविदेशातून हे अनुयायी येत असतात. नागपुरातील अनेक सामजिक संघटना या अनुयायांच्या भोजनाची व्यवस्था करीत असतात. अशीच अविरत सेवा मागील ३० वर्षांपासून संकल्प या संघटनेतर्फे सुरू आहे. संकल्पतर्फे यंदा दोन लाखांवर अनुयायांना भोजनदान करण्यात आले. माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ३० वर्षांपूर्वी आंबेडकरी चळवळीतील आपल्या मित्र मंडळींना सोबत घेऊन दीक्षाभूमीवर येणाºया अनुयायांना भोजनदान करण्याचा संकल्प केला.आज या संकल्पाने चळवळीचे रूप धारण केले आहे. दीक्षाभूमीवर भोजनदानाचे अनेक स्टॉल असतात परंतु संकल्पचे यात वेगळेपण उठून दिसते. दीक्षा सोहळ्यात सलग ४८ तास संकल्पच्या चुलीवर स्वयंपाक सुरू असतो. रांगेत असलेला शेवटच्या भीमसैनिक पोटभर जेवत नाही, तोपर्यंत भूक भागवण्याचा डॉ. नितीन राऊत व त्यांच्या सहकाºयांचा संकल्प असतो.३० वर्षांपूर्वी पाच ते दहा हजार लोकांचे जेवण तयार केले होते. परंतु कलांतराने यात वाढ होत गेली. आता तब्बल दोन लाखांवर अनुयायांना भोजनदान करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
भोजनदानाच्या अविरत सेवेची ३० वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 12:14 AM
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो बौद्ध -आंबेडकरी अनुयायी येतात. देशविदेशातून हे अनुयायी येत असतात.
ठळक मुद्देयंदा दोन लाखांवर अनुयायांची सेवा : प्रत्येकाची भूक भागविण्याचा संकल्प