लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभासाठी आतापर्यंत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांच्या ग्रामीण व शहरी भागातून ३ लाख १ हजार १३४ अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत-जास्त महिलांनी नोंदणी करण्याचे आवाहन, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’साठी सुरु असलेल्या नोंदणीचा आज दुरदृश्यसंवादप्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त यांच्याकडून आढावा घेतला. बिदरी या बैठकीस उपस्थित होत्या. या योजनेच्या नोंदणीसाठी येत्या काहीदिवसात वेबपोर्टल सुरु करुन ही प्रक्रिया गतीमान करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या योजनेच्या लाभासाठी नोंदणी करण्यात येणाऱ्या सर्व मदतकेंद्रावर योजनेच्या अधिकृत माहितीचे फलक लावण्याच्या सुचना करण्यात आल्या. मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आता अंगणवाडी सेविकांबरोबरच ग्राम स्तरावरील अन्य कर्मचाऱ्यांनाही नियुक्त करण्यात येणार आहे. नवीन बदलांसह या योजनेसंदर्भातील सुधारित शासननिर्णय निर्गमित होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागातील मदतकेंद्रांवर ११ जुलैपर्यंत ७५ हजार ४९९ ऑनलाईन तर २ लाख २५ हजार ६३५ ऑफलाईन असे एकूण ३ लाख १ हजार १३४ अर्ज प्राप्त झाले आहेत. नागपूर व चंद्रपूर महानगरपालिकांमध्ये ३२ हजार ४३५ अर्ज प्राप्त झाले आहेत.बैठकीस विकास उपायुक्त तथा या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त विभागीय नोडल अधिकारी कमलकिशोर फुटाणे, नगर प्रशासन उपायुक्त शहा, प्रशांत व्यवहारे आदी उपस्थित होते. तसेच नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हानिहाय अर्जजिल्हा - अर्जाची संख्यानागपूर - १ लाख ८ हजार ४४१चंद्रपूर - १६ हजार ३४९गडचिरोली - १ लाख ५ हजार ४२वर्धा - १२ हजार ४४९भंडारा -३० हजार ७१९ अगोंदिया २८ हजार १४४