लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीच्या ३१.१५ कोटींच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. प्रकल्पाच्या निविदा काढण्याचे कार्यादेश देण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.मागील काही वर्षांपासून गांधीसागर तलाव सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीबाबतचा प्रस्ताव २९ ऑक्टोबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला १२ कोटींच्या मर्यादेत तांत्रिक मान्यतेसह हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या अधीन प्रस्तावास तत्त्वत: मान्यता प्रदान केली आहे. त्याअनुषंगाने सुधारित प्रस्ताव ११ फेब्रुवारी २०१९ रोजी शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार आता हा प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्याला मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यातील खर्च १४.१० कोटी आहे. १२ कोटींच्या वरील भार हा महापालिकेला उचलावयाचा आहे. दुसऱ्या टप्प्यात १६.२५ कोटी खर्च होणार आहे. प्रकल्पावर ध्रुव कन्सल्टंट यांनी सुरुवातीपासून काम केले असल्यामुळे प्रकल्पाचे आराखडे तयार करणे, अहवाल तयार करणे, प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव बनवून सादर करणे तसेच सविस्तर अंदाजपत्रक तयार करणे इत्यादी कामे त्यांनी केली असून, त्यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. यासाठी कन्सल्टंटला प्रकल्पाच्या २ टक्के रक्कम दिली जाणार आहे. शासनाच्या विशेष निधीतून गांधीसागर तलावाच्या मध्यभागी असलेल्या भाऊजी पागे उद्यानाची पुनर्बांधणी, तलावाच्या पडलेल्या भिंती बांधणे व उर्वरित भिंतीचे सशक्तीकरण आदी कामांचा यात समावेश आहे.खाऊगल्ली सुरू होण्याची आशाखाद्यपदार्थ विक्रेत्यांना गांधीसागर तलावाच्या बाजूला मोकळ्या जागेत खाऊगल्ली निर्माण करण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी स्थायी समितीने घेतला होता. त्यानुसार येथे ३२ डोम उभारण्यात आले आहेत. परंतु बांधल्यापासून ते वापराविना पडून आहेत. बाजूच्या रस्त्यांचे सिमेंटीकरण सुरू असल्याने सध्या खाऊगल्लीचा रहदारीसाठी वापर सुरू आहे. या प्रकल्पावर ८० लाखांचा खर्च करण्यात आला आहे. तलाव सौंदर्यीकणामुळे खाऊ गल्लीला चांगले दिवस येण्याची आशा निर्माण झाली आहे.
गांधीसागरच्या सौंदर्यीकरणासाठी ३१.१५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 9:10 PM
गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीच्या ३१.१५ कोटींच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. प्रकल्पाच्या निविदा काढण्याचे कार्यादेश देण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
ठळक मुद्देप्रकल्पाला शासनाची मंजुरी : भाऊजी पागे उद्यानाची पुनर्बांधणी करणार