नागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ६,३३३ नमुने तपासण्यात आले. यापैकी ३१९ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी शहरातील २६८, ग्रामीणचे ५० तर जिल्ह्याबाहेरचा एक जण आहे. मृतांमध्ये शहरातील ३, ग्रामीणचा १ व जिल्ह्याबाहेरचा १ आहे. बुधवारी १३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे होण्याचे प्रमाण सध्या ९२.५९ टक्के इतके आहे. आतापर्यंत १ लाख १ हजार ७३९ रुग्ण बरे झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९ हजार ८८० इतकी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. तर मृतांची संख्या ३,६२० वर पोहोचली आहे.
नागपूर जिल्ह्यात तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये शहरातील ५,०९९ आणि ग्रामीणमधील १,२३४ आहेत. प्रशासनाने सध्या ॲन्टिजेन टेस्टवर भर देणे सुरू केले आहे. एकूण नमुन्यांपैकी ५,१११ नमुन्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. उर्वरित १,२२२ जणांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली. यात १५ पॉझिटिव्ह आढळून आले. खासगी प्रयोगशाळेत १,८९८ नमुन्यांपैकी ८१ पॉझिटिव्ह आले. एम्सच्या प्रयोगशाळेत ३७, मेडिकलमधील प्रयोगशाळेत ५४, मेयोच्या प्रयोगशाळेत ४२, माफसूमध्ये २६, नीरीमध्ये १३ आणि नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ५१ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. सध्या एकूण ४५२१ रुग्ण ॲक्टिव्ह असून यात शहरातील ३९५२ तर ग्रामीणमधील ५६९ आहेत.
बॉक्स
ॲक्टिव्ह ४,५२१
बरे झालेले १,०१,७३९
मृत - ३,६२०