शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

नागपुरातील तब्बल ३२० इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 12:01 PM

नागपूर महापालिकेतर्फे झोन स्तरावर करण्यात आलेल्या सर्वेच्या आधारावर शहरात ३२० इमारती असुरक्षित व जीर्ण झालेल्या आहेत. यापैकी १८३ इमारतींचा आजही उपयोग होत आहे.

ठळक मुद्देमनपाचे दुर्लक्ष मोठी दुर्घटना होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर महापालिकेतर्फे झोन स्तरावर करण्यात आलेल्या सर्वेच्या आधारावर शहरात ३२० इमारती असुरक्षित व जीर्ण झालेल्या आहेत. यापैकी १८३ इमारतींचा आजही उपयोग होत आहे. ९८ इमारती पाडण्यात आल्या आहेत. ३६ इमारतीमध्ये राहणाऱ्यांनी देखभाल दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. इतवारी, गांधीबाग, महालसारख्या जुन्या वस्त्यांमध्ये सर्वाधिक १०५ जीर्ण इमारती आहेत. त्यांना नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. त्या कधीही पडण्याच्या स्थितीत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.पावसाळा म्हटला की, जीर्ण इमारतींचा मुद्दा ऐरणीवर येतो. या काळात एखादा मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील जीर्ण इमारतींचा विचार केला असता शहरात एकूण ३२० इमारती जीर्ण आहेत. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.नागपूर शहरात २० हजार इमारती ३० वर्षावरील आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार ३० वर्षावरील इमारतींचे ऑडिट करणे महापालिकेला बंधनकारक आहे. मात्र या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. ६० वर्षावरील इमारतींची संख्या हजाराहून अधिक आहे. यातील ३३० इमारती अती जीर्ण झालेल्या आहेत. त्या कुठल्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. कायद्यानुसार महापालिकेने किमान अशा जीर्ण इमारतींचे ऑडिट करणे आवश्यक असून यासाठी झोनच्या सहायक आयुक्तांवर याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. झोन अधिकाऱ्यांनी अशा इमारतींचा सर्वे करून संबंधितांना नोटीस बजावण्याची गरज आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. महापालिकेने गत काळात तज्ज्ञांचे पॅनल नियुक्त केले होते. मात्र इमारत मालक त्यांच्याकडे फिरकत नाही. तसेच आजूबाजूचे नागरिकही जीर्ण इमारतीकडे दुर्लक्ष करतात. जीर्ण इमारतीचे दरवर्षी ऑडिट होण्याची गरज आहे. अन्यथा मोठा अपघात होण्याचा धोका आहे.

३१७ जणांना नोटीसजीर्ण इमारत पाडण्यासंदर्भात झोन अधिकाऱ्यांनी शहरातील ३१७ लोकांना नोटीस बजावलेल्या आहेत. मात्र याची इमारत मालक दखल घेत नाही. मागील काही वर्षात ९८ जीर्ण इमारती पाडण्यात आल्या. परंतु ही कारवाई पुरेशी नाही. याची गती वाढविण्याची गरज आहे.

गांधीबाग झोनमध्ये सर्वाधिक १०५ इमारती धोकादायकशहरातील धोकादायक इमारतींचा झोननिहाय विचार केल्यास सर्वाधिक १०५ धोकादायक इमारती गांधीबाग झोनमध्ये आहेत. त्यानंतर नेहरूनगर झोनमध्ये ७०, मंगळवारी झोनमध्ये ४०, लक्ष्मीनगर झोनमध्ये ३२, धंतोली व धरमपेठ झोनमध्ये प्र्रत्येकी २१, सतरंजीपुरा झोनमध्ये १५, हनुमाननगर झोन ९, लकडगंज चार आणि आशिनगर झोनमध्ये ३ धोकादायक इमारती आहेत.

एक सिस्टीम तयार व्हावीशहरात किती इमारती धोकादायक आहेत याचा सर्वे करून एक यादी तयार व्हावी. त्यांना नोटीस पाठवून कारवाई व्हावी. मनपातर्फे हे केले जाते, परंतु त्यात गांभीर्य दिसून येत नाही. यात त्यांच्याही मर्यादा आहेत. कारण लोकांमध्येसुद्धा जागृतीचा अभाव आहे. मनपा कारवाई करते ते लोकांच्या हितासाठीच. परंतु कुणी ऐकत नाही. तेव्हा लोकजागृतीची सुद्धा आवश्यकता आहे. नवीन बांधकामास मंजुरी देतानाच भविष्याच्या विचाराचे नियोजन व्हावे. एकूणच यासंदर्भात एक सिस्टीम तयार करण्याची गरज आहे.- विजय सालनकर, वरिष्ठ आर्किटेक्ट

टॅग्स :Building Collapseडोंगरी इमारत दुर्घटना