लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ संक्रमणादरम्यान २०२० या वर्षात जून ते डिसेंबर या काळात देशभरात जवळपास ३२,९९६.४ टन बायोमेडिकल कचरा निघाला. सर्वाधिक ५,५९७ टन कचरा ऑक्टोबर महिन्यात निघाला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या माहितीनुसार, बायोमेडिकल कचरा निघण्याच्या बाबतीत महाराष्ट्राची स्थिती सर्वात वाईट होती. जून २०० ते डिसेंबर २०२० पर्यंत महाराष्ट्रात जवळपास ५,३६९.२५४ टन बायोमेडिकल कचरा निघाला. तो अन्य राज्यांच्या तुलनेत बराच अधिक होता. निव्वळ ऑगस्ट-२०२० या एकाच महिन्यात महाराष्ट्रात निघालेला १,३५९ टन बायोमेडिकल कचरा हा एक प्रकारचा रेकॉर्डच होता. विशेषज्ज्ञांच्या मते, कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आल्यानंतर बायोमेडिकल कचऱ्यामध्ये वाढ होत आहे.
सीपीसीबीच्या आकडेवारीनुसार या वर्षी एप्रिल महिन्यात संपूर्ण देशात दररोज १३९ टन बायोमेडिकल कचरा निघाला. तर, मे पर्यंत दररोज २०३ टन कचरा निघाला. सीपीसीबीला राज्यांकडून मिळालेल्या आकडेवारीवर नजर टाकली असता, महाराष्ट्रानंतर सर्वाधिक बायोमेडिकल कचरा निर्माण करणाऱ्या राज्यांमध्ये केरळ, गुजरात, तामिळनाडु, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हरियाणा, मघ्य प्रदेश, ओडिशा यांचा समावेश आहे.
कोरोना संक्रमणादरम्यान महिनेवार निघालेला सरासरी बायोमेडिकल कचरा (टन प्रति दिन)
सीपीसीबीला राज्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात सद्यस्थितीत सुमारे १९८ कॉमन बायोमेडिकल ट्रीटमेंट फॅसिलिटीज आहेत. येथे बायोमेडिकल कचरा नष्ट केला जात आहे.