नागपूर : कोविड-१९ संक्रमणादरम्यान २०२० या वर्षात जून ते डिसेंबर या काळात देशभरात जवळपास ३२,९९६.४ टन बायोमेडिकल कचरा निघाला. सर्वाधिक ५,५९७ टन कचरा ऑक्टोबर महिन्यात निघाला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या माहितीनुसार, बायोमेडिकल कचरा निघण्याच्या बाबतीत महाराष्ट्राची स्थिती सर्वात वाईट होती. जून ते डिसेंबर २०२० पर्यंत महाराष्ट्रात जवळपास ५,३६९.२५४ टन बायोमेडिकल कचरा निघाला. तो अन्य राज्यांच्या तुलनेत बराच अधिक होता. निव्वळ ऑगस्ट-२०२० या एकाच महिन्यात महाराष्ट्रात निघालेला १,३५९ टन बायोमेडिकल कचरा हा एक प्रकारचा रेकॉर्डच होता. विशेषज्ञांच्या मते, कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आल्यानंतर बायोमेडिकल कचऱ्यामध्ये वाढ होत आहे.
सीपीसीबीच्या आकडेवारीनुसार यावर्षी एप्रिल महिन्यात संपूर्ण देशात दररोज १३९ टन बायोमेडिकल कचरा निघाला, तर मेपर्यंत दररोज २०३ टन कचरा निघाला. सीपीसीबीला राज्यांकडून मिळालेल्या आकडेवारीवर नजर टाकली असता, महाराष्ट्रानंतर सर्वाधिक बायोमेडिकल कचरा निर्माण करणाऱ्या राज्यांमध्ये केरळ, गुजरात, तमिलनाडू, उत्तरप्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, ओडिशा यांचा समावेश आहे.
...........
कोरोना संक्रमणादरम्यान महिनेवार निघालेला सरासरी बायोमेडिकल कचरा (टन प्रतिदिन)
सीपीसीबीला राज्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात सद्य:स्थितीत सुमारे १९८ कॉमन बायोमेडिकल ट्रीटमेंट फॅसिलिटीज आहेत. येथे बायोमेडिकल कचरा नष्ट केला जात आहे.
..........
सर्वाधिक बायोमेडिकल वेस्ट असणाऱ्या राज्यांची स्थिती : जून २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत (कचरा टनात)
महाराष्ट्र ५,३६९.२५४
केरळ ३,३०१.६०९
गुजरात ३,०८८.८१९
तामिळनाडू २,८१४.६१९
उत्तरप्रदेश २,५०४.८०२
दिल्ली २,४७४.३२३
प.बंगाल २,०९७.९४३
कर्नाटक २,०२७.३४३
मध्यप्रदेश १,४९३.१२९
हरियाणा १,४३६.२९२,
आंध्र प्रदेश १,३४१.९७५
....
- बायोमेडिकल कचरा ठेवण्यात निष्काळजीपणा दाखिविल्यास हेपेटायटिस, एड्स आणि टीबीसारखे गंभीर आजार होऊ शकतात.
- साधारण कचरा संक्रमित बायोमेडिकल कचऱ्यापासून दूर ठेवण्याची गरज आहे. याचे मिश्रण संक्रमण पसरविणारे आजार आणि महामारीच्या प्रसाराला वाव देणारे ठरू शकते.
.....
वर्ष २०२० मध्ये निघालेला कचरा
जून ३,०२५.४१
जुलै ४,२५३.४६
ऑगस्ट ५,२३८.४५
सप्टेंबर ५,४९०,
ऑक्टोबर ५,५९७
नोव्हेंबर ४,८६४.५३
डिसेंबर ४,५२७.५५
एकूण ३२,९९६.४
...