नागपूर : आरटीई अंतर्गत आतापर्यंत ३३१३ बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहे. आरटीईची प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू झाली होती. आरटीईच्या पहिल्या फेरीत ५६११ बालकांची निवड झाली होती. कोरोनामुळे अजूनही काही बालकांचे प्रवेश निश्चित झाले नसल्याने शिक्षण विभागाने ९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
यंदा आरटीईअंतर्गत बालकांची निवड यादी दोन महिन्यांपूर्वीच जाहीर केली. त्यात ५ हजार ६११ बालकांची निवड करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यानंतर ११ जूनपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. ३० जूनपर्यंत निवड झालेल्या बालकांचे प्रवेश निश्चित करायचे होते. परंतु ३० जूनपर्यंत पूर्ण प्रवेश न झाल्याने शिक्षण विभागाने ९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.