शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

७ वर्षांत सापडल्या ३४ लाख बनावट नोटा

By admin | Published: May 28, 2016 2:46 AM

बनावट नोट ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी समस्या बनलेली आहे. देशभरात गेल्या ७ वर्षांमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल ३४ लाख बनावट नोटा आढळून आल्या.

१५९ कोटींचे मूल्य : ५०० रुपयांच्या नोटांची संख्या सर्वाधिकनागपूर : बनावट नोट ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी समस्या बनलेली आहे. देशभरात गेल्या ७ वर्षांमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल ३४ लाख बनावट नोटा आढळून आल्या. या नोटांचे मूल्य १५९ कोटी रुपयांहून अधिक आहे.अर्थव्यवस्था पोखरण्यासाठी प्रत्यक्षामध्ये बाजारात याहून अधिक बनावट नोटा आणल्या गेल्या आहेत. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी बनावट नोटांसंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेकडे विचारणा केली होती. २००९ पासून देशात किती बनावट नोटा आढळल्या, त्यांचे मूल्य किती होते, सर्वाधिक बनावट नोटा कोणत्या होत्या इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार एप्रिल २००९ ते डिसेंबर २०१५ या कालावधीमध्ये देशभरात ३४ लाख ३ हजार ३१८ बनावट नोटा आढळून आल्या. यांचे मूल्य १५९ कोटी ४४ लाख ७३ हजार २५ इतके आहे. २०१४-१५ या कालावधीत सर्वात जास्त ५ लाख ९४ हजार ४४६ बनावट नोटा आढळल्या. एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१५ या कालावधीत ३ हजार ९ बनावट नोटा या दैनंदिन व्यवहारादरम्यान आढळून आल्या. २० हजार ३८४ नोटा या बँकामधील आपापसातील व्यवहारात सापडल्या. २३ हजार ३९३ नोटा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाला सापडल्या, तर ४ लाख ४० हजार ७१६ बनावट नोटा विविध बँकाना आढळून आल्या. १००० रुपयांच्या ६ लाखाहून अधिक बनावट नोटामिळालेल्या माहितीनुसार या कालावधीत देशभरातील विविध बँकांत ३४ लाख ३ हजार ३१८ बनावट नोटा सापडल्या. यात रुपये १०, २०, ५०, १००, ५०० व १००० रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश आहे. यात ५०० रुपयांच्या सर्वात जास्त बनावट नोटा आढळून आल्या. यांची संख्या १७ लाख ५७ हजार ४३४ इतकी असून मूल्य ८७ कोटी ८७ लाख १७ हजार इतके आहे. १००० रुपयांच्या ६ लाख १ हजार २६१ बनावट नोटा आढळून आल्या. यांचे मूल्य ६१ कोटी ६२ लाख ६१ हजार इतके आहे.