शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

विशेष रेल्वेगाड्यांमधून ३४० प्रवासी नागपुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 7:48 PM

रेल्वेने जागोजागी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. बुधवारी तीन विशेष रेल्वेगाड्या नागपुरात दाखल झाल्या. यात ३३० प्रवासी बिलासपूर, नवी दिल्ली आणि बंगळूरूला रवाना झाले तर ३४० प्रवासी विविध ठिकाणावरून नागपुरात दाखल झाले. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

ठळक मुद्दे३३० प्रवासी रवाना : रेल्वेस्थानकावर प्रवाशांची झाली गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेने जागोजागी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. बुधवारी तीन विशेष रेल्वेगाड्या नागपुरात दाखल झाल्या. यात ३३० प्रवासी बिलासपूर, नवी दिल्ली आणि बंगळूरूला रवाना झाले तर ३४० प्रवासी विविध ठिकाणावरून नागपुरात दाखल झाले. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.नागपूर रेल्वेस्थानकावर बुधवारी तीन विशेष रेल्वेगाड्या दाखल झाल्या. सकाळी ५.५० वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०२४४२ नवी दिल्ली-बिलासपूर ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर आली. या गाडीतून १९० प्रवासी बिलासपूरकडे रवाना झाले तर १४२ प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकावर उतरले. त्यानंतर सकाळी ११ वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०२४९२ नवी दिल्ली-बंगळूरू एक्स्प्रेस आली. या गाडीतून ३९ प्रवासी सिकंदराबादला रवाना झाले तर नागपूर रेल्वेस्थानकावर १२३ प्रवासी उतरले. प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या आत जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात आला. बाहेर पडताना आरपीएफ ठाण्याच्या शेजारील जिन्यावरून बाहेर सोडण्यात आले. बाहेरगावी जाणाऱ्या आणि नागपुरात उतरलेल्या प्रत्येक प्रवाशाची स्क्रिनिंग केल्यानंतरच त्यांना रेल्वेस्थानकाच्या आत आणि बाहेर सोडण्यात आले. विमानतळाप्रमाणे प्रवासाच्या एक तास आधीपर्यंत प्रवाशांना आत सोडण्यात आले. दुपारी ३.३६ वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०२६९१ बंगळूरू-नवी दिल्ली एक्स्प्रेस आली. या गाडीतून १०१ प्रवासी नवी दिल्लीकडे रवाना झाले तर ७५ प्रवासी खाली उतरले. प्रवाशांना त्यांच्या परिसरात सोडण्यासाठी महापालिकेच्या बसेस रेल्वेस्थानकावर हजर होत्या. अनेक प्रवाशांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले होते. बुधवारीही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर रोखण्यात आले. त्यामुळे अनेक प्रतिनिधी रेल्वेस्थानकावर येऊन आल्यापावली परत गेले.३४० प्रवाशांना केले होम क्वारंटाईन

नागपूर रेल्वेस्थानकावर उतरलेल्या ३४० प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार या प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारल्यानंतर त्यांना रेल्वेस्थानकाच्या बाहेर सोडले. या प्रवाशांना १४ दिवस घरातच राहण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केल्या.प्रवाशांची झाली गैरसोयरेल्वेस्थानकावर गाडीतून उतरलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यात आली. परंतु तपासणी करताना ऐनवेळी तीन थर्मल स्क्रिनिंग मशीन बंद पडल्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसून रहावे लागले. यात रेल्वेने प्रत्येक प्रवाशाची माहिती, मोबाईल क्रमांक, पत्ता नोंदवून घेतल्यामुळेही प्रवाशांना रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडण्यासाठी एक तास वेळ लागला. किमान रेल्वे प्रशासनाने चांगल्या थर्मल स्क्रिनिंग मशीन उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले.जिना उतरताना प्रवाशांना होतोय त्रासरेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकाच्या आत जाणाऱ्या प्रवाशांना मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देणे सुरु केले आहे तर बाहेर पडताना आरपीएफ ठाण्याच्या शेजारील जिन्यावरून उतरून प्रवाशांना बाहेर पडावे लागत आहे. यात सामान घेऊन ४० पायऱ्या उतरताना प्रवाशांची दमछाक होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना सामान घेऊन उतरताना तसेच महिलांना आपल्या मुलांना कडेवर घेऊन उतरताना मोठा त्रास होत आहे. आत जाताना प्रवाशांना एक तासापूर्वी आत सोडण्यात येत आहे. त्यामुळे बाहेर पडताना प्रवाशांना मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर जाऊ द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी