उमरेड : ट्रान्सपाेर्ट कार्यालयात कामाला असलेल्या एकाने कार्यालयातून राेख ३४ हजार रुपये घेऊन पाेबारा केला. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्यांतर्गतच्या वेकाेलि येथील साई ट्रान्सपाेर्ट येथे रविवारी (दि. २०) घडली. अरविंदकुमार बन्सीलाल सैनी (३८, रा. २४२, डब्ल्यूसीएल काॅलनी, उमरेड) यांचे साई ट्रान्सपाेर्ट नावाने कार्यालय आहे. या कार्यालयात ट्रान्सपाेर्टचे काम सांभाळण्यासाठी आराेपी वकील खान (रा. डब्ल्यूसीएल काॅलनी, उमरेड) हा गेल्या आठ महिन्यापासून व्यवहार सांभाळत हाेता. दरम्यान, घटनेच्या दिवशी दिवसभरात जमा झालेले राेख ३४ हजार रुपये घेण्यासाठी अरविंदकुमार सैनी हे कार्यालयात गेले असता, कार्यालयात कामाला असलेल्या आराेपीने राेख ३४ हजार रुपये चाेरून नेल्याचे आढळले. त्यानुसार सैनी यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी भादंवि कलम ३८१ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास पाेलीस नाईक नीतेश मेश्राम करीत आहेत.
ट्रान्सपाेर्ट कार्यालयातून राेख ३४ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:09 AM