शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

नागपुरातील कोविड सेंटरवरील ३५ लाखांचा खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 8:40 PM

नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, मनपा प्रशासनाने कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग मंडळाच्या जागेत ५ हजार बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात ५०० बेड सज्ज ठेवले होते. परंतु पावसाळ्याच्या दिवसात येथे रुग्णांना ठेवणे शक्य नसल्याने यावरील ३५ लाखांचा खर्च पाण्यात गेला आहे.

ठळक मुद्देराधास्वामी सत्संग मंडळाच्या जागेवर उभारले होते सेंटरपावसाळ्यात रुग्णांना ठेवणे अशक्य : गाद्या भिजल्या, लोखंडी बेड जंगले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, मनपा प्रशासनाने कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग मंडळाच्या जागेत ५ हजार बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात ५०० बेड सज्ज ठेवले होते. परंतु पावसाळ्याच्या दिवसात येथे रुग्णांना ठेवणे शक्य नसल्याने यावरील ३५ लाखांचा खर्च पाण्यात गेला आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी मंगळवारी या कोविड सेंटरला आकस्मिक भेट दिली. येथील २०० बेडवर गाद्या गुंडाळून ठेवल्या होत्या. पाणी गळत असल्याने अनेक बेड ओले झाल्याचे निदर्शनास आले. जोराचा पाऊस आल्यास शेडमध्ये ठिकठिकाणी पाणी गळते. परिसरात साचलेले पाणी शेडमधून वाहते. शौचालयाची व्यवस्था शेड बाहेर आहे. परंतु जोराचा पाऊस आल्यास तेथे जाणे शक्य होत नाही. येथील पलंग जंग खात आहेत. उषा, चादर व अन्य साहित्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला परंतु त्या व्यवस्थित ठेवलेल्या नाहीत, असे विदारक चित्र बघायला मिळाले. आतापर्यंत या सेंटर मध्ये एकही रुग्ण ठेवला नाही. येथे कोणत्याही स्वरूपाची व्यवस्था नसल्याची माहिती पिंटू झलके यांनी दिली.पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता खर्चशहरात कोविड सेंटरसाठी पर्यायी जागा उपलब्ध असताना नागपूरपासून २५ किलोमीटर अंतरावरील राधास्वामी सत्संग मंडळाच्या जागेत कोविड सेंटर उभारण्यात आले. परंतु येथे कुठल्याच स्वरूपाच्या सुविधा नाहीत. सेंटर उभारताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप पिंटू झलके यांनी केला.खर्चाची चौकशी व्हावीमनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे कोविड सेंटर वरील ३०-३५ लाखाचा खर्च पाण्यात गेला आहे. राधास्वामी सत्संग मंडळाच्या जागेवरील सेंटर प्रमाणेच नागपूर शहरातील मनपाच्या पाच रुग्णालयातील कोविड सेंटरची अशीच अवस्था आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी झलके यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाRainपाऊस