कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनलॉकच्या काळात आता मासिक बील नियमित यायला लागले आहेत. मात्र राज्यामधील विजेच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. या वर्षी फक्त ३.५ टक्के वाढ झाल्याचे राज्य सरकार आणि प्रदेश विद्युत नियामक आयोग सांगत आहे. असे असले तरी, ग्राहकांच्या बिलांचे अध्ययन केल्यावर ही वाढ ३.५ टक्के नव्हे तर १३.३९ टक्सके झाल्याचे दिसत आहे.
राज्यात विजेची दरवाढ लॉकडाऊनच्या कायात १ एप्रिलपासून लागू झाली आहे. तेव्हा रीडिंग आणि बिल वितरण बंद होते. जून-जुलै महिन्यात तीन ते चार महिन्यांचे एकदम बिल आले. आॅक्टोबरपर्यंत परिस्थिती सामान्य होऊन आता एक महिन्याचे बिल यायला लागले आहे. घरगुती ग्राहकांना २१० युनिटसाठी १,८४० रुपयांचे बिल येत आहे.नव्या दरांची घोषणा करताना ० ते १०० युनिटपर्यंच्या उपयोगासाठी दर घटविल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात दर ४.३३ रुपये प्रति युनिटवरून ४.९१ रुपये झाले आहेत. थेट ३३.३९ टक्क्यांनी ही वाढ आहे. ०१ ते ३०० पर्यंतच्या युनिट वापरासाठी ८.८८ रुपये प्रति युनिट दर ठेवण्यात आला आहे. यात प्रति युनिटचा दर ४.९१ रूपयांवरून वाढून ८.८८ रुपये झाला आहे. या श्रेणींमधील दरांमध्ये असणाऱ्या तफावतीमुळे विजेची बिले वाढली आहेत. सर्वाधिक ग्रहक या दोन श्रेणीतच येतात. यामुळे याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर पडत आहे.यात भरीस भर म्हणजे, फिक्स्ड चार्ज ९० रुपयांवरून १०० रुपए झाला आहे. कागदोपत्री दर वृद्धी घटविल्याचे दाखविण्यासाठी अधिक श्रेणीतील वीज दरात वाढ करण्यात आलेली नाही. ३०५ ते ५०० युनिटसाठी ५.२८ टक्के आणि ५०१ ते १००० करिता २.९७ कटक्के वाढ करण्यात आली आहे. १००१ पेक्षा अधिक उपयोगाच्या युनिटसाठी ४.५० टक्के दर घटविला आहे. या श्रेणीत फारच कमी ग्राहक येतात. नेमक ी घट दाखवून दरवाढ घटविल्याचा दावा केला जात आहे.