शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

नागपुरातील नाले दुरुस्तीचा ३५० कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 9:06 PM

पावसाळ्याच्या दिवसात शहरातून वाहणाऱ्या नाल्यांचे पुराचे पाणी वस्त्यात शिरते. नाल्यातील दूषित पाण्याची दुर्गंधी यामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका विचारात घेता शहरातील नाल्यांची दुरुस्ती, खोलीकरण व संरक्षण भिंत घालण्याबाबतचा ३५० कोटींचा प्रकल्प अहवाल तयार करून कार्यकारी अभियंता यांना दिला आहे. हा प्रस्ताव निधीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमनपा स्थायी समिती अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांची पत्रकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळ्याच्या दिवसात शहरातून वाहणाऱ्या नाल्यांचे पुराचे पाणी वस्त्यात शिरते. नाल्यातील दूषित पाण्याची दुर्गंधी यामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका विचारात घेता शहरातील नाल्यांची दुरुस्ती, खोलीकरण व संरक्षण भिंत घालण्याबाबतचा ३५० कोटींचा प्रकल्प अहवाल तयार करून कार्यकारी अभियंता यांना दिला आहे. हा प्रस्ताव निधीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.लोकसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी शहरातून वाहणाऱ्या नाल्यांची समस्या मांडली. शहरातील सर्वच भागात ही समस्या आहे. याचा विचार करता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचा विस्तृत असा ३५० कोटींचा अहवाल तयार करून राज्य सरकारकडे पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले.मे पर्यंत एक लाख एलईडी बसविणारशहरातील पथदिवे बदलवून १ लाख ४० हजार एलईडी दिवे लावण्याचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. परंतु गतकाळात हे काम संथ होते. यात काही अडचणी होत्या. जेमतेम ४० हजार एलईडी लावण्यात आले. या कामात गती आणून मे २०१९ पर्यंत शहरात एक लाख एलईडी लावण्याचे निर्देश विद्युत विभागाला देण्यात आल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली. करारानुसार कंत्राटदारांनी डिसेंबर २०१८ पर्यंत १.४० लाख एलईडी लावणे अपेक्षित होते. यावर २१७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र अडचणीमुळे शक्य झाले नाही, अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. जैस्वाल यांनी दिली.खड्डे बुजवण्यासाठी ५ कोटींची तरतूदपावसाळ्याच्या दिवसात शहरातील डांबरी रस्त्यांवर खड्डे पडतात. जेट पॅचर मशीनच्या साहाय्याने खड्डे बुजविले जातात. खड्डे दुरुस्तीसाठी अर्थसंकलपात ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शहरातील डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम जेट पॅचर मशीनच्या माध्यमातून करण्यात येते. खड्डे बुजवण्यासाठी तरतूद केली जाते. विभागाकडून खड्डे बुजवण्याचा दावाही के ला जातो. प्रत्यक्षात शहरातील रस्त्यांवर खड्डे कायम असल्याचे चित्र आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाState Governmentराज्य सरकार