लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोळा आणि दुसऱ्या दिवशीचा तान्हा पोळा अशा दोन दिवसाच्या पोळा सणाच्या बंदोबस्तासाठी शहर पोलीस दल सज्ज झाले आहे. एसआरपीएफ, होमगार्ड, आरसीपी यांच्यासह ३ हजार ५०० पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत.मंगळवारी पोळा आणि बुधवारी तान्हा पोळा असे सलग दोन दिवस हा सण साजरा केला जातो. वर्षभर कष्ट उपसून लाखमोलाचे पीक पदरात घालून देणाºया बैलाच्या उपकाराची जाणीव ठेवून शेतकरीबांधव पोळा साजरा करतात. दुसºया दिवशी बालगोपालांसाठी तान्हा पोळा साजरा केला जातो. हे दोन्ही दिवस मद्यपी आणि जुगारी यांच्यासाठी पर्वणीचे असतात. ठिकठिकाणी जुगार अड्डे भरतात. अवैध दारू विक्रीलाही उधाण आलेले असते. त्यामुळे भांडणे होतात. अनेक गुंड वचपा काढण्याच्या तयारीत असतात. हे सर्व लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताची जोरदार तयारी केली आहे.शहरातील ३२ ही पोलीस ठाण्यातील पोलीस आपापल्या भागात कडक बंदोबस्त ठेवणार आहेत. दोन्ही दिवस दिवसा आणि रात्री पोलिसांची गस्त राहणार असून झोपडपट्टी सर्चिंग मोहीम राबविली जाणार आहे. ठिकठिकाणी छापेमारीही केली जाणार आहे.असा राहील बंदोबस्तपोलीस उपायुक्त : ७सहायक आयुक्त : ८पोलीस निरीक्षक : ४०पीएसआय आणि एपीआय : १५०पोलीस कर्मचारी : २५००आरसीपी पथक : ६एसआरपीएफ : २ कंपनीहोमगार्ड : ५५०
नागपुरात पोळा सणाच्या बंदोबस्तासाठी ३,५०० पोलीस सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:43 AM
पोळा आणि दुसऱ्या दिवशीचा तान्हा पोळा अशा दोन दिवसाच्या पोळा सणाच्या बंदोबस्तासाठी शहर पोलीस दल सज्ज झाले आहे. एसआरपीएफ, होमगार्ड, आरसीपी यांच्यासह ३ हजार ५०० पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देएसआरपीएफ, होमगार्ड आणि क्यूआरटीही तैनातरात्रीची गस्त सुरूठिकठिकाणच्या झोपडपट्टीत तपासणी अवैध धंद्यावर छापेमारी, गुन्हेगारांचीही धरपकड