लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : नऊ वर्षानंतर नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली असून, १८ संचालक पदांसाठी एकूण ७६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले हाेते. अर्ज माागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४० जणांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. माघार घेणाऱ्यांमध्ये पंचायत समितीचे माजी सभापतिद्वय राजू हरणे व वसंत चांडक यांचा समावेश आहे.
बाजार समितीच्या १८ संचालकांपैकी ११ संचालक सेवा सहकारी संस्था गटातून निवडून द्यावयाचे आहेत. यात सात जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर दाेन जागा महिला, एक जागा मागासवर्गीय व एक जागा विजा/भज/विमाप्र प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहे. ग्रामपंचायत गटातून चार संचालक निवडून द्यायाचे असून, यातील दाेन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर प्रत्येकी एक जागा अनुसूचित जाती-जमाती आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली आहे. अडते व व्यापारी गटातून एक तर हमाल व मापारी गटातून एक संचालक निवडून द्यावयाचा आहे.
या निवडणुकीतून पंचायत समितीचे माजी सभापतिद्वय शिवसेनेचे राजू हरणे व राष्ट्रवादीचे वसंत चांडक यांनी माघार घेतली आहे. दुसरीकडे बाजार समितीचे माजी सभापतिद्वय सुरेश आरघाेडे व बबन लाेहे रिंगणात उतरले आहेत. दाेन्ही गटांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
...
आघाडी व युतीतील जागा वाटप
ही निवडणूक महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस) तसेच भाजप व माजी आमदार आशिष देशमुख यांच्या युतीत लढली जात आहे. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा देण्यात आल्या असून, काँग्रेस व शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी चार जागा गेल्या आहेत. दुसरीकडे भाजपने स्वत:कडे सात जागा घेतल्या असून, आशिष देशमुख गटाला आठ जागा मिळाल्या आहेत. त्यांना व्यापारी व हमाल गटासाठी एकही उमेदवार मिळाला नाही. महाविकास आघाडीने व्यापारी, मापारी, हमाल गटातून काँग्रेसचे तीन उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.