लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या वर्षी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेपपिकाच्या प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शासनाकडून वर्षभरानंतर मदत निधी देण्यात आला आहे.
मागील वर्षी (२०२०) फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. यात मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले होते. शासनाच्या आदेशावरूर नुकसानाचे पंचनामे करण्यात आले होते. यात ३२ हजार ९९४.४८ हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचे समोर आले. नुकसानच्या मदतीकरता ३६ कोटी ६३ लाख १९ हजार रुपयाचा मदत निधी सरकारकडून देण्यात आला आहे. यंदाही खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टी व पुरामुळे अनेक भागातील पिकांचे नुकसान झाले. सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले. धान व कापसालाही फटका बसला. सरकारकडून वर्षभरानंतर का होईना मदत निधी मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
तालुका बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये) मदत निधी (रुपयात)
नागपूर ग्रा. ३३.८० ४५,०७४०
कामठी ६५३.९० ४४,४६,५२०
मौदा २२९५३.१५ २७,१७,१९,४००
काटोल १२५.०० २२,५०,०००
नरखेड २३१.०० ३४,२९,०००
रामटेक १७०.०५ १२,८४,०००
पारशिवनी ५८६.०० ७९,२९,०००
सावनेर १२५२.०० १,७९,२६,६००
उमरेड ४२८.१८ २९,५६,४५०
भिवापूर १७.०० २,३४,०००
कुही ६५४४.०० ५, ३४,३०,३००
हिंगणा १८.४० २,६२,९९०