शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

तीन वर्षांत ३६ जणांचा जीव गेला, ४७ गंभीर जखमी तरीही....

By जितेंद्र ढवळे | Published: November 29, 2023 5:54 PM

काटोल-सावरगाव मार्गाचे रुंदीकरण कधी?

नागपूर : अरुंद असलेला काटोल-सावरगाव मार्ग सध्या अपघात मार्ग झाला आहे. या मार्गावर दिवसाआड लहान-मोठे अपघात होत असतात. गत तीन वर्षात या मार्गावर झालेल्या विविध अपघातात ३६ जणांचा जीव गेला तर ४७ जण गंभीर जखमी झाले आहेत. तरीही या मार्गाचे रुंदीकरण कधी होणार, याबाबत लोकप्रतिनिधी वा अधिकारी यांनी मौन बाळगले आहे. काटोल-सावरगाव वडचिचोली मार्गे मध्य प्रदेशला जोडला जाणार राज्य मार्ग आहे. या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे.

काटोल शहरातून जाणाऱ्या या मार्गावर जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कोंढाळी राष्ट्रीय मार्गावरून मध्य प्रदेशला जाण्याकरिता हा मार्ग सोईचा ठरतो. या मार्गावरून मध्य प्रदेश, सावनेर आदी भागांतून रेतीचे टिप्पर रात्रन् दिवस धावतात. अशात या मार्गावर काटोल-सावरगाव-नरखेड यामध्ये येणाऱ्या अनेक गावांच्या दुचाकी-चारचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते.

गत तीन वर्षात या मार्गावर झालेल्या अपघातांपैकी ८० टक्के अपघातांचे कारण मार्गाची कमी रुंदी असल्याचे आढळून आले आहे. अनेकदा मोठी गाडी आली की दुसऱ्या बाजूने येणारी गाडी ही सरळ खाली जाते. त्यामुळे गाडी चालकाचा तोल जाऊन अपघात झाले आहेत. काहींना ओव्हरटेक करताना पुढे जागाच मिळाली नसल्याने अपघात झाले आहेत.

काटोल-सावरगाव मार्गावर येनवा, डोंगरगाव, मेंडकी, मसली सोनोली आणि अनेक गावांतील शेकडो नागरिक नियमित काटोल शहरात रोजगार व इतर कामांसाठी येतात. या मार्गावर गत पाच वर्षांत वर्दळ वाढली आहे. या मार्गाचे तातडीने रुंदीकरण होणे गरजेचे आहे.

- सागर भैस्वार, रा. मेंडकी

पूर्वी या मार्गावर मोजक्याच वाहनांची वर्दळ असायची. आज यात मोठी वाढ झाली आहे. काटोल-डोंगरगावपर्यंत तर आता लोकवस्ती वाढली आहे. मी डोंगरगाव येथील कंपनीत नोकरीला जातो. अशात नियमित अपघात झाल्याचे दिसून येतात. त्यामुळे कमीत कमी डोंगरगावपर्यंत तरी या मार्गाचे रुंदीकरण आवश्यक आहे.

- संदीप बरडे, खंते ले-आऊट, काटो

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर