शहरं
Join us  
Trending Stories
1
Agniveer: "शहीदाच्या कुटुंबाला पैसे मिळत नाहीत"! राहुल गांधींच्या दाव्यावर काय म्हणाले अग्निवीर अक्षय गवते यांचे वडील?
2
देवदर्शनाचा मोफत प्रवास नडला २१ जण जखमी; खेड तालुक्यातील एका भावी आमदाराची राजकीय वारी
3
'पंतप्रधान नरेद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढवायची होती, पण...'; राहुल गांधींचा लोकसभेत मोठा गौप्यस्फोट?
4
VIDEO : राहुल गांधी यांनी भगवान शिव शंकरांचा फोटो दाखवताच कॅमेरा फिरला! काँग्रेस म्हणाली, बघा 'जादू'!
5
UPSC प्रीलिम्स 2024 परीक्षेचा निकाल जाहीर; मेन्सची तारीख पाहा...
6
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी
8
मेधा पाटकरांना 5 महिने कारावास अन् 10 लाखांचा दंड, 23 वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा
9
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात हमरीतुमरी; माझ्यावर बोट केलं, तर....
10
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी 
11
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
12
'सिंचन घोटाळ्यातील आरोपी भाजपसोबत', AAP खासदाराच्या टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
13
राजस्थानमध्ये भीषण अपघात! बोलेरो-ट्रकची धडक; ९ जणांचा मृत्यू
14
“गर्व है कि हम हिंदू हैं!”; राहुल गांधी यांच्या विधानावरुन योगी आदित्यनाथ यांचे प्रत्युत्तर
15
“उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, २ वर्षांत FDIमध्ये अव्वल”: उदय सामंत 
16
"मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या ६३ खासदारांना जनतेने कायमस्वरुपी बसवलं", महुआ मोईत्रांचा हल्लाबोल
17
"माझा भाऊ कधीच हिंदूंचा अपमान करू शकत नाही’’, राहुल गांधींच्या बचावासाठी प्रियंका गांधी सरसावल्या  
18
'लिहून देतो, तुमचा गुजरातमध्ये पराभव करणार...', लोकसभेतून राहुल गांधींचे BJP ला थेट आव्हान
19
“खऱ्या अर्थाने वंचित, दलितांना न्याय देण्याचे काम भाजपा करते”; अमित गोरखेंची प्रतिक्रिया
20
Maharashtra Vidhan Parishad Election 2024 विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवार जाहीर, पंकजा मुंडेंसह या पाच जणांना संधी

रस्ते दुरुस्तीसाठी गरज ३६४ कोटींची; मिळाले केवळ ५ कोटी 

By गणेश हुड | Published: July 17, 2023 3:20 PM

जि.प.चे पदाधिकारी म्हणतात देताच कशाला तेही परत घ्या !

नागपूर : मागील वर्षात अतिवृष्टी  व पुरामुळेजिल्हयातील रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले. त्याआधीच्या दोन-तीन वर्षातही अशीच परिस्थिती होती. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तब्बल २ हजार किलोमीटरलर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३६४ कोटींची गरज आहे. जिल्हा नियोजन समितीकडे २०२३-२४ या वर्षात ३०/५४ शीर्षकात ५० कोटींचा निधी मिळावा असा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु जिल्हा परिषदेतला फक्त ५ कोटी मिळाले. ही ग्रामीण भागातील लोकांची थट्टा असल्याने हाही निधी शासनाने परत घ्यावा, अशी भूमिका जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

ग्रामीण भागातील कमीत कमी २ हजार किलोमीटर रस्त्याचे बांधकाम व दुरुस्ती तसेच पुलाचे बांधकाम व दुरुस्ती करायची आहे .मागील वर्षात जुलै व ऑगस्ट महिन्यात महिन्यांत अनेकदा अतिवृष्टी झाली. यामुळे नदी, नाल्यांना पूर आले. जिल्ह्यात १ लाख १४ हजार हेक्टरमधील शेतीपिकांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे अनेकांचे जीवही गेले. जनावरेही वाहून गेली. तर काहींचा वीज पडून मृत्यू झाला. पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचेही नुकसान झाले.

जिल्‍हा परिषद अंतर्गत ४ हजार किमींपेक्षा अधिकचे रस्ते येतात. यातील एक हजार  किमींचे रस्ते खराब झाले आहेत.  रस्ते खराब झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना ये-जा करण्यास मोठी अडचण होत आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या प्रमुख व अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३६४ कोटींची गरज आहे. रस्ते दुरुस्तीचा  दरवर्षी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे पाठविला जातो. मात्र निधी मिळत नाही. 

५ कोटीही परत घ्या

दरवर्षी अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे नुकसान होत आहे. परंतु शासनाकडून निधीच मिळत नाही. २०१६ ते १०२१ काळात रस्ते दुरुस्तीसाठी ३६४ कोटींच्या मागणीचे प्रस्ताव शासन स्तरावर पाठविण्यात आले. परंतु एकही रुपया शासनाकडून देण्यात आला नाही. परिषद बांधकाम विभागाच्या सभापतींना व जिल्हा परिषद च्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांना पडला प्रश्न पडला की या  ५ कोटी मध्ये पैसे द्यायचे तरी कोणाला. त्यामुळे हा निधी शासनाने परत घ्यावा. 

- कुंदा राऊत, उपाध्यक्ष, जि.प.

टॅग्स :zpजिल्हा परिषदroad safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर