लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसाठी २८ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडे ४ गटांतील ८ जागांसाठी एकूण ३७ इच्छुकांचे अर्ज आले आहेत. यातील ४ उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्यामुळे ४ जागांसाठी ३३ उमेदवार शर्यतीत आहेत.व्यवस्थापन परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांना १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नामनिर्देशन सादर करायचे होते. विद्यापीठाच्या नव्या कायद्यानुसार व्यवस्थापन परिषदेत एकूण २१ सदस्य राहणार आहेत. विधीसभेतील प्राचार्य गटातून २ (खुला + व्हीजेएनटी), अध्यापक गटातून २ (खुला + ओबीसी), व्यवस्थापन प्रतिनिधी गटातून २ (खुला + एससी) व नोंदणीकृत पदवीधर गटातून २ (खुला + एसटी) असे एकूण ८ उमेदवार विधीसभेतून व्यवस्थापन परिषदेत जाणार आहेत. विधीसभेच्या निवडणुकांमधील निकालांच्या आधारावर अध्यापक गटातून ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेले डॉ. नितीन कोंगरे, प्राचार्य गटातून ‘व्हीजेएनटी’ प्रवर्गातून विजयी झालेले डॉ. चंदनसिंग रोटेले, व्यवस्थापन प्रतिनिधी गटातील अनुसूचित जाती प्रवर्गातून विजयी झालेले डॉ. सुधीर फुलझेले व पदवीधर गटातून ‘एसटी’ प्रवर्गातील विजयी उमेदवार दिनेश शेराम हे व्यवस्थापन परिषदेवर जाणार आहेत. मात्र नियमांनुसार त्यांनादेखील अर्ज भरणे आवश्यक होते.खुल्या प्रवर्गातील ४ जागांसाठी ३३ जणांनी अर्ज भरले. यातील प्राचार्य गटातील खुल्या प्रवर्गातून ६ जणांनी अर्ज भरले आहेत तर व्यवस्थापन गटातून ४ जण मैदानात आहेत. शिक्षक गटातील खुल्या प्रवर्गातून ६ अर्ज आले आहेत. नुकत्याच झालेल्या पदवीधर गटातून ५ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.वैध उमेदवारांची यादी २० फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात येईल. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते १ या कालावधीत निवडणूक होईल व त्याच दिवशी निकाल घोषित करण्यात येतील.सर्वच संघटनांतून आले अर्जविधीसभेप्रमाणे व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात अद्यापपर्यंत कुठल्याही संघटनेमध्ये आघाडी झालेली नाही. त्यामुळे सर्वच संघटनांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख २२ फेब्रुवारी ही असून तोपर्यंत आघाडी झाल्यास रिंगणातील उमेदवारांची संख्या कमी होऊ शकते.
नागपूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषद निवडणुकीसाठी ३७ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 7:10 PM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसाठी २८ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडे ४ गटांतील ८ जागांसाठी एकूण ३७ इच्छुकांचे अर्ज आले आहेत. यातील ४ उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्यामुळे ४ जागांसाठी ३३ उमेदवार शर्यतीत आहेत.
ठळक मुद्दे खुल्या प्रवर्गात सर्वाधिक चुरस