शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

नागपूर मेट्रोसाठी जर्मनीच्या बँकेकडून ३७५० कोटी रुपये

By admin | Published: April 02, 2016 3:15 AM

नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी जर्मनीची केएफडब्ल्यू विकास बँक ३७५० कोटी रुपयांचे (५० कोटी युरो) कर्ज देणार आहे.

करारावर स्वाक्षरी : मार्च २०१९ मध्ये सुरू होणार मेट्रोची सफरप्रमोद गवळी  नवी दिल्ली/नागपूरनागपूर मेट्रो प्रकल्पासाठी जर्मनीची केएफडब्ल्यू विकास बँक ३७५० कोटी रुपयांचे (५० कोटी युरो) कर्ज देणार आहे. नॉर्थ ब्लॉक येथे शुक्रवारी केएफडब्ल्यू आणि केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने यासंबंधी करारावर स्वाक्षरी केली. या प्रकल्पाच्या दक्षिण आणि उत्तर क्षेत्राचे काम अनुक्रमे जून आणि सप्टेंबर २०१८ मध्ये पूर्ण केले जाणारं असून प्रत्यक्षात मार्च २०१९ मध्ये मेट्रोची सफर सुरू होऊ शकेल.या प्रकल्पावरील अंदाजे खर्च ८६८० कोटी रुपये असून उपरोक्त रक्कम कर्जाच्या स्वरुपात मिळत असून त्यातून मेट्रो रेल्वेचे डब्बे, मेट्रो मार्ग, विद्युत पुरवठा, निर्मितीसंबंधी कामे पूर्ण केली जातील, असे नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी करारानंतर सांगितले. अर्थमंत्रालयाच्या अधिकृत विकास सहायता(ओडीए) कोट्यातून हे कर्ज उपलब्ध करवून दिले जात आहे. सहा महिन्यांच्या चर्चेनंतर आम्ही या कराराप्रत पोहोचण्यात यशस्वी झालो आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल. जर्मनीच्या बँकेकडून मिळणारे कर्ज २० वर्षांत परत केले जाईल. पहिल्या पाच वर्षांत केवळ व्याजाची रक्कम चुकती केली जाईल. ठीक करारापूर्वी ०.६ टक्के व्याजदरावर शिक्कामोर्तब करण्यात आले.केंद्र-राज्य भागीदारीतून विशेष कंपनी...या प्रकल्पासाठी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने ५०:५० भागीदारीत विशेष कंपनीची स्थापना केली आहे. एनएमआरसीएलसोबत होणाऱ्या करारातून हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. भारत- जर्मनीच्या भागीदारीतून हा पर्यावरणपूरक करार प्रत्यक्षात आला आहे. त्यासाठी दोन तृतीयांश सौर ऊर्जेचा वापर केला जाणार आहे. आर्थिक व्यवहार संयुक्त सचिव एस. सेल्वाकुमार, केएफडब्ल्यू बँकेचे आशियाई महासंचालक रोलँड सिल्लर यांनी या करारावर स्वाक्षरी केली. जर्मनीचे भारतातील राजदूत डॉ. मार्टिन नी, नगरविकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुकुंद सिन्हा, महाराष्ट्राचे गुंतवणूक आणि राजशिष्टाचार आयुक्त लोकेशचंद्र यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.