लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) बांधकाम व परिसर विकासासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ३७९. ६८ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत नागपूरसह अमृतसर, बोधगया, संबलपूर, सिरमौर, विशाखापट्टणम आणि जम्मू या देशातील एकूण सात आयआयएमच्या बांधकाम व परिसर विकासासाठी एकूण ३७७५.४२ कोटींच्या निधीला मंजुरी दिली.या आयआयएमची स्थापना २०१५-१६ आणि २०१६-१७ साली करण्यात आली होती. सध्या या संस्थांचे काम तात्पुरत्या परिसरात सुरू आहे. या परिसरांसाठी एकूण अंदाजे खर्च ३७७५.४२ कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी २८०४.०९ कोटी रुपये, या संस्थांच्या स्थायी परिसराच्या बांधकामासाठी खर्च केले जाणार आहेत. या सर्व आयआयएम ६०,३८४ चौरस किलोमीटर परिसरात विकसित केले जातील.प्रत्येक आयआयएममध्ये ६०० विद्यार्थ्यांसाठी सर्व अद्ययावत पायाभूत सुविधा उभारल्या जातील. वारंवार होणाऱ्या खर्चांमध्ये या सर्व संस्थामधल्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे वार्षिक पाच लाख रुपये, पाच वर्षांसाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यानंतर या संस्थाना मिळणाºया अंतर्गत निधी उभारणीच्या उत्पन्न स्रोताकडून पुढचे खर्च भागवले जाणे अपेक्षित आहे.
नागपूर आयआयएमसाठी ३७९ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 10:30 AM
नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) बांधकाम व परिसर विकासासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ३७९. ६८ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.
ठळक मुद्देपंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय