लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत या कारणांमुळे होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण मोठे आहे. विशेष म्हणजे, ३८ टक्के मातामृत्यू केवळ अतिरक्तस्रावाने होतात. नवजात बालमृत्यूचा दर हजारामागे २९ एवढा आहे. २०१२ च्या तुलनेत दोन्ही आकडेवारी कमी असल्यातरी बळीची संख्या आणखी कमी करण्याच्या दृष्टीने ‘नार्चिकॉन-२०१८’ ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे, अशी माहिती बालरोग तज्ज्ञ व या परिषदेचे आयोजक अध्यक्ष डॉ. वसंत खळतकर यांनी पत्रपरिषदेत दिली.याप्रसंगी परिषदेच्या आयोजक अध्यक्ष डॉ. निर्मला वझे, सचिव डॉ. प्रगती खळतकर, डॉ. क्षमा केदार, डॉ. निशिकांत कोतवाल, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. पौर्णिमा करंदीकर, डॉ. अलका मुखर्जी, डॉ. सुषमा देशमुख आदी उपस्थित होत्या.डॉ. वसंत खळतकर म्हणाले, शिशुमृत्यूदराचे प्रमाण हजारामागे ४१, तर पाच वर्षाच्या आतील मुलांचा मृत्यूदर हजारामागे ५२ एवढा आहे. महाराष्ट्रात एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८या दहा महिन्यात १३५०० बालकांचा मृत्यू झाला आहे. बालमृत्यूमागे अनेक कारणे आहेत. यावर चर्चा व मार्गदर्शनासाठी ‘नॅशनल असोसिएशन आॅफ रिप्रोडक्टीव्ह अॅण्ड चाईल्ड हेल्थ आॅफ इंडिया’ नागपूर शाखा व ‘एम.के.पी. साळवे आयुर्विज्ञान संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने २८ पासून तीन दिवसीय १४ व्या जागतिक भारतीय ‘नार्चिकॉन-२०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. प्रगती खळतकर म्हणाल्या, राज्यात २००३ मध्ये एक लाखामागे ३०१ मातामृत्यू दर होता. २०१२ मध्ये हेच प्रमाण १७० तर २०१८ मध्ये हे प्रमाण १२०वर आले आहे. या वर्षी हे प्रमाण १००वर आणण्याचे लक्ष्य आहे. माता मृत्यूसाठी संसर्गमोठे कारण ठरते. यात मृत्यूचे प्रमाण ११ टक्केआहे, उच्चरक्तदाबामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ५ टक्के, विविध गुंतागुंतीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ८ टक्के आहे.गर्भपात मृत्यूचे प्रमाण ५ टक्केनुकतेच सरकारने स्त्रीला नको असलेल्या गर्भपाताला मंजुरी दिली आहे. यामुळे साधारण ९० टक्के गर्भपात वैधपद्धतीने होत आहेत. परंतु आजही ९ ते १० टक्के गर्भपात अवैध पद्धतीने होत असल्याने यात मातामृत्यूचे प्रमाण ५ टक्के आहे. जनजागृती व तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचाराने हा दरही टाळता येऊ शकतो, असे मतही तज्ज्ञानी मांडले. संचालन डॉ. देशमुख यांनी केले तर आभार प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी मानले.
३८ टक्के मातामृत्यूला रक्तस्राव कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 8:46 PM
गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत या कारणांमुळे होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण मोठे आहे. विशेष म्हणजे, ३८ टक्के मातामृत्यू केवळ अतिरक्तस्रावाने होतात. नवजात बालमृत्यूचा दर हजारामागे २९ एवढा आहे. २०१२ च्या तुलनेत दोन्ही आकडेवारी कमी असल्यातरी बळीची संख्या आणखी कमी करण्याच्या दृष्टीने ‘नार्चिकॉन-२०१८’ ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे, अशी माहिती बालरोग तज्ज्ञ व या परिषदेचे आयोजक अध्यक्ष डॉ. वसंत खळतकर यांनी पत्रपरिषदेत दिली.
ठळक मुद्देबालमृत्यू दर हजारात २९ : बालरोग व स्त्रीरोग तज्ज्ञाची माहिती