लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी टाटानगर-इतवारी पॅसेंजरच्या जनरल डब्यात तस्करी करण्यात येत असलेल्या ११ किलो गांजा जप्त केल्याची घटना शुक्रवारी कामठी रेल्वेस्थानकावर घडली.रेल्वे सुरक्षा दलाला रेल्वेगाडी क्रमांक ५८१११ टाटानगर-इतवारी पॅसेंजरमधून गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार आरपीएफच्या जवानांनी सापळा रचला. टाटानगर-इतवारी पॅसेंजर कामठी रेल्वेस्थानकावर येताच जवानांनी गाडीची तपासणी केली. त्यांना जनरल डब्यात एक ट्रॉली बॅग आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना बॅगबाबत विचारणा केली असता बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. त्यामुळे बॅग कळमना रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर उतरविण्यात आली. बॅग उघडून पाहिली असता त्यात वेगवेगळ्या आकाराचे पाच पाकीट आढळले. पॅकेट उघडले असता त्यात गांजा आढळला. वजन केल्यानंतर ११ किलो गांजा असल्याचे स्पष्ट झाले. ही कारवाई वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्ड्येय, सहायक सुरक्षा आयुक्त ए. के. स्वामी यांच्या आदेशानुसार कामठी येथील उपनिरीक्षक मो. मुगीसुद्दीन, उपनिरीक्षक बी. लेंबो, प्रधान आरक्षक प्रकाश रायसेडाम, सतीश इंगळे, ईशांत दीक्षित, प्रवेश कुमार मीना यांनी पार पाडली. जप्त केलेला गांजा इतवारी लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.जप्त केलेल्या गांजासह आरपीएफचे उपनिरीक्षक मो. मुगीसुद्दीन, बी. लेंबो, प्रधान आरक्षक प्रकाश रायसेडाम, सतिश इंगळे, ईशांत दिक्षीत, प्रवेश कुमार मीना
टाटानगर-इतवारी पॅसेंजरमधून ११ किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:09 AM
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी टाटानगर-इतवारी पॅसेंजरच्या जनरल डब्यात तस्करी करण्यात येत असलेल्या ११ किलो गांजा जप्त केल्याची घटना शुक्रवारी कामठी रेल्वेस्थानकावर घडली.
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : इतवारी लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन