लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोकाट श्वानांमुळे शहरातील नागरिक दहशतीत आहेत. श्वानांवर नियंत्रणाची जबाबदारी महापालिकेची आहे. असे असूनही गेल्या पाच वर्षात १२४३० श्वानांवर नसबंदी करण्यात आली. वास्तविक शहरात मोकाट श्वानांची संख्या ९० हजारांच्या आसपास आहे. परंतु उशिरा का होईना महापालिका प्रशासनाने श्वानांच्या नसबंदीचा प्रश्न गंभीरतेने घेतला आहे. सातारा येथील वेट फॉर अॅनिमल संस्थेतर्फे गेल्या ४० दिवसात ६२० श्वानांवर नसंबंदी करण्यात आली आहे.२०१८-१९ या वर्षात एकूण १७४५ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. यात १३ फेब्रुवारी २०१९ ते २५ मार्च २०१९ दरम्यान सातारा येथील संस्थेच्या पथकाने ६२० नसबंदी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. उर्वरित ११२५ श्वानांवर भांडेवाडी येथील अॅनिमल शेल्टरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यावरून मोकाट श्वानांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासनाला जाग आल्याचे दिसून येते.शस्त्रक्रि या करण्याची गती आणखी किती दिवस कायम राहते याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. कारण अनेकदा नसबंदी शस्त्रक्रिया मोहिमेला सुरुवात झाली. परंतु काही महिन्यात ही प्रक्रिया बंद पडल्याचा जुना अनुभव आहे.अॅनिमल बर्थ कंट्रोल (डॉग)अधिनियम २००१ अंतर्गत मोकाट श्वानांवर नसबंदी करून त्यांची संख्या नियंत्रणात आणता येते. श्वानांची दहशत विचारात घेता महापालिकेने वर्ष २००६-०७ मध्ये नसबंदी सुरू केली होती. त्यावर्षात १७१७१ श्वानांवर तर वर्ष २००७ -०८ या वर्षात २६५०३ तर वर्ष २००८-०९ या वर्षात ७१८७ श्वानांवर नसबंदी करण्यात आली होती. मात्र यातील घोटाळा पुढे आल्याने ही प्रक्रिया संथ झाली. वर्ष २००९-१० मध्ये ५७४२,वर्ष २०१०-११ मध्ये २१९७, वर्ष २०११-१२ मध्ये फक्त ३७ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतरच्या दोन वर्षात ही प्रक्रिया ठप्पच होती. यामुळे नागरिकांचा महापालिकेवर रोष होता. प्रयत्न करूनही या प्रक्रियेला गती मिळत नव्हती. त्यामुळे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या उपक्रमाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला.नसबंदी शस्त्रक्रिया व अॅन्टीरेबीज व्हॅक्सिनेशनसाठी एक्स्प्रेशन आॅफ इंटेन्ट (ईआआई) मागविण्यात आला. अॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडिया, चेन्नई यांच्या दराच्या आधारावर प्रति श्वान ७०० रुपये दर निश्चित करण्याला स्थायी समितीने २३ जून २०१७ रोजी मंजुरी दिली. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये नागपूरच्या एस.पी.सी.संस्थेला नसबंदीचे काम देण्यात आले.अॅनिमल शेल्टरची जबाबदारी निश्चितश्वानांच्या मृत्यूनंतर मार्च २०१८ मध्ये भांडेवाडी येथील अॅनिमल शेल्टर येथे नसबंदीसाठी एका वरिष्ठ पशुचिकि त्सकासह पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु फेब्रुवारी २०१९ पर्यंत ११२५ श्वानांवर नसबंदी करण्यात आली. येथे श्वानांची ने-आण करण्यासाठी दोन वाहनांची व्यवस्था करण्यात आली. परंतु अद्याप येथील नसबंदी उपक्रमाला गती आलेली नाही.दररोज ३० नसबंदीचे लक्ष्यदररोज ३० श्वानांवर नसबंदी करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. महाराजबाग येथील जिल्हा पशुचिकि त्सा रुग्णालयात तीन हजार चौरस फूट क्षेत्रात नसबंदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शस्त्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेºयात होत असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली. ४० दिवसात ६२० श्वानांवर नसबंदी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.