नागपूर : लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारच्या ६०,७०० रुपयांच्या तुलनेत शनिवारी सोन्याच्या दरात ४०० रुपयांची घसरण होऊन भावपातळी ६०,३०० रुपयांपर्यंत कमी झाली, तर चांदीच्या दरातही १२०० रुपयांची घसरण होऊन भाव प्रतिकिलो ७२,४०० रुपयांच्या तुलनेत ७१,२०० रुपयांपर्यंत कमी झाले. उतरत्या दराचा फायदा घेत ग्राहकांनी दोन्ही मौग्ल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली.७ नोव्हेंबरला सोने ५०० रुपयांनी कमी होऊन ६०,९०० रुपयांवर पोहोचले. चांदीत तब्बल १४०० रुपयांची घसरण होऊन ७१,८०० रुपयांवर पोहोचले. ८ नोव्हेंबरला सोने ६१ हजार आणि ९ नोव्हेंबरला १०० रुपयांनी कमी होऊन ६०,९०० रुपयांवर आले. १० नोव्हेंबर धनत्रयोदशीला सोन्याचे भाव २०० रुपये आणि शनिवार, ११ रोजी भाव ४०० रुपयांनी कमी होऊन ६०,३०० रुपयांवर स्थिरावले. भाव कमी झाल्याने ग्राहकांना सोने खरेदीची सुवर्णसंधी असल्याचे सराफांनी सांगितले.
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला सोन्यात ४००; चांदीत १२०० रुपयांची घसरण
By मोरेश्वर मानापुरे | Published: November 11, 2023 9:03 PM