नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यापेक्षा वाढतच चालला आहे. चार दिवसात चार हजारांवर रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी १०७० नव्या रुग्णांची भर पडली तर, ८ रुग्णांचे जीव गेले. रुग्णांची एकूण संख्या १,५३,८८२ व मृतांची संख्या ४,३६५ झाली. विशेष म्हणजे, मागील तीन दिवसापासून दैनंदिन चाचण्यांची संख्या १० हजारावर जात आहे. आज चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण ९.७४ टक्क्यावर गेले.
नागपूर जिल्ह्यात आज ७,६५९ आरटीपीसीआर व ३,३१९ रॅपिड अँटिजेन असे एकूण १०,९७८ कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. आरटीपीसीआरमध्ये १०२६ तर अँटिजेनमधून ५३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात मेडिकलच्या प्रयोगशाळेत १८०, मेयोच्या प्रयोगशाळेत १७७, एम्सच्या प्रयोगशाळेत १२९, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत १००, नीरीच्या प्रयोगशाळेत ६१ तर खासगी लॅबमधून ३७० रुग्णांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत १२७७३६१ संशयित रुग्णांच्या चाचण्या झाल्या. यात ८३९०६८ आरटीपीसीार तर ४३८२९३ अँटिजेन चाचण्यांचा समावेश आहे.
-बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवरून ९० टक्क्यांवर
१ फेब्रुवारी रोजी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९४.५७ टक्के होते. ४ मार्च रोजी ते ९०.९० टक्क्यांवर आले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. आज ७२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १३९८८६ झाली आहे.
-शहरात ८४५ तर ग्रामीणमध्ये २२३ रुग्ण
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ८४५, ग्रामीणमधील २२३ तर जिल्हाबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ४, ग्रामीण व जिल्हाबाहेरील प्रत्येकी २ रुग्णांचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत १२२७२९ रुग्ण व २८१७ मृत्यू तर, ग्रामीणमध्ये ३०२०० रुग्ण व ७७७ मृत्यूची नोंद झाली आहे.
-मेडिकलमध्ये १६८ तर, मेयोमध्ये ७६ रुग्ण
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शासकीयसह खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. सध्या मेडिकलमध्ये १६८, मेयोमध्ये ७६ तर, एम्समध्ये ४५ रुग्ण भरती आहेत. खासगीमध्ये सर्वाधिक ८५ रुग्ण, किंग्जवे हॉस्पिटलमध्ये आहेत. उर्वरित रुग्णालयात ४ ते ५० दरम्यान रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण २५८० रुग्ण उपचाराखाली आहेत. ७०५१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
- दैनिक चाचण्या : १०९७८
- बाधित रुग्ण : १५३८८२
_- बरे झालेले : १३९८८६
- उपचार घेत असलेले रुग्ण : ७०५१
- मृत्यू : ४३६५