शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
3
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
4
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
5
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
6
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
7
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
8
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
9
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
10
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
11
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
13
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
14
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
16
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
17
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
18
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
19
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
20
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!

४०२ कोटी रुपयांचा वीजबिल भरणा ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 9:15 PM

electricity bill payment online मागील दोन महिन्यांपासून कोरोना साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात लागू असलेल्या प्रतिबंधामुळे महावितरणकडून देण्यात आलेल्या वीज देयकाचा भरणा वीजग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने केला आहे. जानेवारी ते मे-२०२१ या काळात नागपूर परिमंडळात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीजग्राहकांनी तब्बल ४०२ कोटी रुपयांचा भरणा ऑनलाइन पद्धतीने केला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात नागरिकांची ऑनलाइनला पसंती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील दोन महिन्यांपासून कोरोना साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात लागू असलेल्या प्रतिबंधामुळे महावितरणकडून देण्यात आलेल्या वीज देयकाचा भरणा वीजग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने केला आहे. जानेवारी ते मे-२०२१ या काळात नागपूर परिमंडळात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीजग्राहकांनी तब्बल ४०२ कोटी रुपयांचा भरणा ऑनलाइन पद्धतीने केला आहे.

नागपूर शहरातील वीजग्राहकांनी लॉकडाऊनच्या काळात २९८ कोटी रुपयांची देयके ऑनलाइन पद्धतीने भरली आहेत. एप्रिल महिन्यात नागपूर शहरातील २ लाख ८० हजार ६३८ वीजग्राहकांनी ५२ कोटी ९ लाख रुपयांचा भरणा, तर मे महिन्यात ३ लाख २५ हजार ३८० वीजग्राहकांनी ७५ कोटी ६८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. जानेवारी ते मे-२०२१ या काळात शहरातील १४ लाखापेक्षा अधिक वीजग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीचा वापर करीत वीज देयकाचा भरणा केला आहे. नागपूरच्या ग्रामीण भागातही वीजग्राहकांचा ऑनलाइन पद्धतीने वीज देयकाची रक्कम भरण्याचा कल वाढू लागला आहे. मे महिन्यात प्रतिबंध असल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घराबाहेर पडून वीज देयकाची रक्कम भरण्यासाठी वीजबिल भरणा केंद्रावर जाणे शक्य नव्हते. परिणामी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ७९,६५९ वीजग्राहकांनी त्यांच्याकडे असलेली १२ कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने महावितरणच्या तिजोरीत जमा केली. एप्रिल महिन्यात ६२,६९९ वीजग्राहकांनी ८ कोटी ६६ लाख रुपयांची रक्कम जमा केली. जानेवारी ते मे-२०२१ या काळात ग्रामीण भागातील सुमारे साडेतीन लाख वीजग्राहकांनी ५७ कोटी ४१ लाख रुपयांचा भरणा ऑनलाइन पद्धतीने केला.

नागपूर जिल्ह्यासोबतच वर्धेतील वीजग्राहकांचा ऑनलाइन पद्धतीने वीज देयकाची रक्कम भरण्याकडे कल वाढू लागला आहे. जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार वीजग्राहकांनी २६ कोटी पेक्षा अधिक रकमेचा भरणा ऑनलाइन पद्धतीने केला आहे. संपूर्ण मे महिन्यात वर्धेत संचारबंदी असताना वर्धेतील ६६ हजार ८०१ वीजग्राहकांनी जवळपास ४७ कोटी रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने महावितरणकडे जमा केली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिलonlineऑनलाइन