लाेकमत न्यूज नेटवर्क
खात : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अराेली (ता. माैदा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खात परिसरातील बाेरगाव फाटा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक करणारे दाेन टिप्पर पकडले. यात टिप्परचालकांसह मालकांवर गुन्हा नाेंदविण्यात आला असून, त्यांच्याकडून एकूण ४० लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. १६) पहाटे ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक परिसरात गस्तीवर हाेते. दरम्यान, त्यांना खात परिसरातून रामटेकच्या दिशेने रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती प्राप्त झाली हाेती. त्यामुळे या पथकाने खात (ता. माैदा) परिसरातील बाेरगाव फाटा येथे नाकाबंदी करीत एमएच-३६/एए-२४७९ व एमएच-३६/एए-३४७९ क्रमांकाचे दाेन टिप्पर थांबवून झडती घेतली. त्यांना त्या टिप्परमध्ये रेती असल्याचे आढळून आल्याने त्यांनी कसून चाैकशी सुरू केली.
त्या टिप्परमधील रेती विना राॅयल्टी व ओव्हरलाेड असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी दाेन्ही टिप्पर ताब्यात घेत टिप्परचालक तुळशीदास वसंता शेंडे (२९, रा. पचखेडी, जिल्हा भंडारा), लाेकेश बळीराम मारवाडे (३१, रा. चांदाेरी, जिल्हा भंडारा) व मालक मिथुन विजय नागदिवे (३३, रा. वरठी, जिल्हा भंडारा) यांच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला. या कारवाईमध्ये त्यांच्याकडून ४० लाख रुपये किमतीचे दाेन टिप्पर आणि ४० हजार रुपये किमतीची २० ब्रास रेती असा एकूण ४० लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी अराेली पाेलिसांनी भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते, हवालदार ज्ञानेश्वर राऊत, अमाेल वाघ, विपीन गायधने, अमाेल कुथे यांच्या पथकाने केली.