शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

४०५ नव्या रुग्णांची वाढ, ३६३ बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 4:08 AM

नागपूर : दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु आता तीन आठवड्यांचा कालावधी होऊनही रुग्णांची संख्या ...

नागपूर : दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु आता तीन आठवड्यांचा कालावधी होऊनही रुग्णांची संख्या ४०० ते ५०० दरम्यान स्थिर आहे. सोमवारी ४०५ नव्या रुग्णांची भर तर १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १,१४,९३१ झाली असून मृतांची संख्या ३,७४८वर पोहचली. आज ३६३ रुग्ण बरे झाले.

नागपूर जिल्ह्यात दिवाळीनंतर रुग्णांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात होती. परंतु नंतर ५३६ वर रुग्णसंख्या गेली नाही. यातच मृतांचा आकडाही १५च्या आत स्थिर राहिला. मात्र थंडी व प्रदूषण वाढल्यास रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३५०, ग्रामीणमधील ५० तर जिल्ह्याबाहेरील ५ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ७, ग्रामीणमधील १ तर जिल्ह्याबाहेरील ५ आहेत. विशेष म्हणजे, आज चाचण्यांच्या संख्येत घट आली. २,३५५ आरटीपीसीआर तर १,३०२ रॅपिड ॲन्टिजेन असे मिळून ३६५७ चाचण्या झाल्या. शहरात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ८३,५२३, ग्रामीणमध्ये २१,९९४ अशी एकूण १,०५,५१७ वर गेली आहे. सध्या ५,६६६ कोरोनाबाधित रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

-प्रदूषण वाढल्यास प्रादुर्भावाचा धोका

तापमानात घट होऊन प्रदूषण वाढल्यास प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु सिरो सर्वेक्षणात शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात ॲन्टिबॉडीज म्हणजे रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे नागपूरकरांची ‘हर्ड इम्युनिटी’ वाटचाल असल्याने धोका वाढला तरी त्याची तीव्रता कमी असेल, असेही बोलले जात आहे.

::कोरोनाची आजची स्थिती

-दैनिक संशयित : ३,६५७

-बाधित रुग्ण : १,१४,९३१

_-बरे झालेले : १,०५,५१७

- उपचार घेत असलेले रुग्ण : ५,६६६

- मृत्यू : ३,७४८