नागपूर : कोरोना संसर्गाच्या १० महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत ४०९० रुग्णांचे बळी गेले. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ३.१२ टक्के आहे. मंगळवारी २७८ नवे बाधित व ९ रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या १३०८९७ झाली आहे. आज रुग्णसंख्येच्या तुलनेत ४२२ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९३.९७ टक्क्यांवर पोहोचले आहे.
नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चाचण्यांची संख्या रोडावली आहे. मंगळवारी ३५४८ कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ३०४१ आरटीपीसीआर, तर ५०७ रॅपिड अँटिजन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीआरमधून २१५, तर अँटिजनमधून ६३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. नव्या रुग्णांमध्ये शहरातील २२३, ग्रामीणमधील ५१, तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ४, ग्रामीणमधील १, तर जिल्ह्याबाहेरील ४ मृत्यू आहेत. विशेष म्हणजे, शहरात २७०३, ग्रामीणमध्ये ७२७, तर जिल्ह्याबाहेरील ६६० रुग्णांचे जीव गेले.
-शहरात ९८४१८ रुग्ण बरे
नागपूर जिल्ह्यात १२३००० रुग्णांनी कोरोनावर मात केली. यात शहरातील ९८४१८, तर ग्रामीणमधील २४५८२ रुग्ण आहेत. सध्या ३८०७ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील १०१६ रुग्ण रुग्णालयात, तर २७९१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
-दैनिक संशयित : ३८०७
-बाधित रुग्ण : १३०८९७
_-बरे झालेले : १२३०००
- उपचार घेत असलेले रुग्ण : ३८०७
- मृत्यू : ४०९०