कळमेश्वर तालुक्यात १७ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. हा आकडा शनिवारच्या तुलनेत कमी आहे. या नवीन रुग्णांमध्ये कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील दाेन रुग्ण असून, तालुक्यातील गोंडखैरी येथील दाेन, धापेवाडा येथील दाेन, कळंबी येथील एक, उपरवाही येथील एक, सेलू येथील एक, चौदामैल येथील एक, आष्टीकला येथील एक, केतापार येथील एक, घोराड येथील एक, म्हसेपठार येथील एक, उबाळी येथील एक, तेलकामठी येथील एक तसेच वरोडा येथील एक रुग्ण आहे.
कन्हान (ता. पारशिवनी) शहरात रविवारी १४ रुग्णांची नाेंद करण्यात आली. शहरात ६१ जणांची रॅपिड ॲन्टीजेन तर ४७ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली असून, यातील १४ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे त्यांच्या रिपाेर्टवरून निष्पन्न झाले आहे. या १४ रुग्णंामुहे शहरातील एकूण रुग्णसंख्या १,१९६ झाली असून, यातील ९६८ रुग्णांवी काेराेनावर मात केली तर ३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. याेगेश चाैधरी यांनी दिली. नरखेड तालुक्यातील १४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यातच एका रुग्णाचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. या १४ रुग्णांमध्ये एक रुग्ण नरखेड शहरातील असून, १३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यात पिपळा (केवळराम) येथील सहा, मोवाड येथील चार, सावरगाव येथील एक, जलालखेडा येथील एक आणि खुशालपूर येथील एक रुग्ण आहे.