लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचे तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने उष्माघाताच्या रुग्णांत वाढ झाली आहे. आतापर्यंत ४१० रुग्णांची नोंद झाली असून गेल्या आठवड्याभरात यात ८० वर रुग्णांची भर पडल्याची माहिती आहे. उष्माघातासोबतच गॅस्ट्रोच्या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. ३८० वर रुग्णांना भरती करून उपचार करण्यात आले आहेत.शासकीय रुग्णालयांच्या शीत वॉर्डमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या कमी आहे, मात्र, दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रोच्या रोगाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषत: वृद्ध व लहान मुलांची संख्या मोठी आहे. मनपा आयसोलेशन रुग्णालयात एप्रिल महिन्यात १४०० रुग्णांनी उपचार घेतले, तर मे महिन्यात आतापर्यंत १२५० रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती आहे. यातील ३८० रुग्णांवर भरती करून उपचार करण्यात आले आहेत. दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या या आजारापासून सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.उष्माघाताचा मृत्यू नाहीउष्माघात संशयित मृत्यूची संख्या नऊवर गेली आहे. परंतु महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे अद्यापही या आजराच्या मृत्यूची नोंद नाही. ‘डेथ ऑडिट’ झाल्यावरच तशी नोंद केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
नागपुरात उष्माघाताचे ४१० रुग्ण : मृत्यूची नोंद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:46 PM
शहराचे तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने उष्माघाताच्या रुग्णांत वाढ झाली आहे. आतापर्यंत ४१० रुग्णांची नोंद झाली असून गेल्या आठवड्याभरात यात ८० वर रुग्णांची भर पडल्याची माहिती आहे. उष्माघातासोबतच गॅस्ट्रोच्या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. ३८० वर रुग्णांना भरती करून उपचार करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देगॅस्ट्रोच्याही रुग्णांत वाढ