विशेष न्यायालय : कोट्यवधीच्या अपसंपदेचे प्रकरणनागपूर : भ्रष्टाचाराच्या मार्गाने कोट्यवधीची अपसंपदा जमविल्याप्रकरणी जरीपटक्याच्या सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक दीपक खूबचंद बजाज आणि त्यांच्या पत्नी वीणा बजाज यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने ४,१०० पानांचे आरोपपत्र सोमवारी दाखल केले.या दाम्पत्याने ४१४ कोटी ९ लाख ९३ हजार ७८६ रुपयांची अपसंपदा प्राप्त केली असल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.बजाज अद्यापही कारागृहातनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ सप्टेंबर २०१५ रोजी दीपक बजाज आणि वीणा बजाज यांच्याविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१)(ड) (ई), १३ (२) आणि भादंविच्या ४०६, ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. वीणा बजाज यांना ६ आॅक्टोबर २०१५ रोजी अटक करण्यात आली होती. दीपक बजाज हे सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामिनाची लढाई हरल्यानंतर त्यांनी १२ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांपुढे शरणागती पत्करली होती. दीपक बजाज हे अद्यापही नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांना जामीन मिळालेला नाही; मात्र वीणा बजाज जामिनावर आहे. दीपक बजाज यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने आरोपपत्र स्वीकारले. वीणा बजाज खुद्द न्यायालयात हजर होत्या. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील गिरीश दुबे आरोपींच्या वतीने अॅड. कैलाश डोडानी, अॅड. कमल सतुजा आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक आसाराम शेटे उपस्थित होते. ५५ बँक खाती खुद्द दीपक बजाज, वीणा बजाज आणि मुलांची एकूण ५५ बँक खाती असून या सर्व खात्यांमध्ये २ कोटी ८५ लाख ९९ हजार ७९३ रुपये आढळून आले आहे. या शिवाय ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स आणि स्टेट बँक आॅफ इंडिया येथे लॉकर्स आढळून आले आहेत. २००२ ते २००५ या काळात अॅडमिशनच्या नावाखाली बजाज दाम्पत्याने विद्यार्थ्यांकडून २३ लाख ६७ हजार २५० रुपये घेतले होते. त्यापैकी ९ लाख ६८ हजार रुपये पालकांना परत केले होते. १३ लाख ९९ हजार २५० रुपये अद्यापही परत केले नाही. दीपक बजाज यांनी आपली मुलगी डिम्पी दीपक बजाज ऊर्फ गुरविंदरसिंग कांदा हिच्या लग्नासाठी २२ लाख रुपये खर्च केले. हा विवाह सोहळा आर्यसमाज भवन येथे पार पडला होता. बजाज यांच्याकडे चार आलिशान मोटारगाड्या आहेत. त्यांनी ‘चेहरा’ या चित्रपटाची तीन कोटी रुपये खर्च करून निर्मिती केली होती. बजाज बँक लॉकरमधून सोने जप्त करण्यात आले.पदाचा दुरुपयोगमहात्मा गांधी सेंटिनियल हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून दीपक बजाज हे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून मासिक ७६ हजार ७३३ रुपये पगार घेत होते. ते आपल्या पदाचा दुरुपयोग करून सिंधू एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून अनेक वर्षांपासून विविध स्वरूपाची शुल्क आकारणी करून तसेच शिक्षकांचा मूळ पगार दडपून कमी पगार देत होते. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर देणगीच्या स्वरूपात लाच घेत होते. बजाज दाम्पत्याविरुद्ध ४,१०० पानांचे आरोपपत्र अब्जावधीच्या हिशेबाच्या चिठ्ठ्याडॉ. दीपक बजाज यांच्या जरीपटका के.सी. बजाज मार्गावरील महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कूल परिसरातील साईकृपा या प्रिन्सिपल बंगल्याची आणि अन्य ठिकाणाची २४ सप्टेंबर २०१५ झडती घेण्यात आली होती. एसीबीच्या पथकाला १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख आढळून आले होते. या रकमेपैकी १६ लाख ९० हजार ९७८ रुपये बजाज यांच्या घरी, १ लाख ५ हजार ५५० रुपये संस्थेच्या लिपिक कार्यालय व स्टाफ रूममधून आणि १८ हजार ९४० रुपये वीणा बजाज यांच्या कार्यालयातून जप्त करण्यात आले होते. दीपक बजाज हे सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि त्यांच्या पत्नी वीणा बजाज या अध्यक्षा आहेत. मुलगी डिम्पी बजाज ही सहायक शिक्षिका आहे. दीपक बजाज यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ३ कोटी १० लाख ५५ हजार १४६ रुपये प्राप्त केल्याचे प्रारंभीच्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यापैकी १ कोटी ५६ लाख ७ हजार १२८ रुपये विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य डोनेशन घेऊन आणि भ्रष्ट मार्गाने शिक्षकांच्या नेमणुका करून प्राप्त करण्यात आले होते. ३८ दिवस फरार असल्याच्या काळात दीपक बजाज यांनी आपल्या संगणकामधील ४ अब्ज ७ कोटी ७३ लाख ७८ हजार ३६६ रुपयांच्या व्यवहाराची हार्डडिक्स बेपत्ता केल्याचे आढळून आले होते. त्यांच्या बेडरूममध्ये त्यांच्या हस्ताक्षरात २६ चिठ्ठ्या आढळून आल्या होत्या. त्यावर बजाज यांनी दुसऱ्या व्यक्तींना व्याजाने दिलेल्या रकमांचा उल्लेख होता. ही रक्कम ३ अब्ज ९७ कोटी १६ लाख २७ हजार २९७ एवढी मोठी आहे. बेडरूममधूनच ९७ वस्तू खरेदी केल्याच्या पावत्या आढळून आल्या. त्यांची किंमत १० कोटी ५७ लाख ५१ हजार ६९ रुपये आहे. सर्व ११७ चिठ्ठ्यांची रक्कम ४ अब्ज ७ कोटी ७३ लाख ७८ हजार ३६६ एवढी मोठी आहे.बजाज यांचा ‘चेहरा द मास्क’बजाज यांनी २००९-१० यावर्षी गरिमा फिल्मस् मल्टिट्रेड नावाची कंपनी उघडली होती. चार अनुदानित आणि तीन विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य शुल्क गोळा करून तसेच शिक्षक नियुक्तीतून गैरमार्गाने मिळवलेला पैसा ते या कंपनीत गुंतवीत होते. त्यांनी ‘चेहरा द मास्क’ हा चित्रपट ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करून तयार केला होता. याच रकमेतून गरिमा म्युझिकचा व्यवसायही सुरू केला होता. सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लागणारे सहा लाखांचे लाईटस् खरेदी करून ते भाड्याने देण्याचा व्यवसायही त्यांनी सुरू केला होता. वीणा बजाज यांनी पोलीस कोठडी रिमांडदरम्यान आपल्या तीन लॉकर्सची माहिती एसीबीला दिली होती. हे तिन्ही लॉकर्स तोडण्यात आले असता केवळ एकाच लॉकरमध्ये अडीच किलो सोने आढळून आले. दीपक बजाज यांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या आवारातच स्टुडंटस् स्टोअर्स उघडले होते. या दुकानाचा गुमास्ता परवाना मात्र अनिल बजाज या खासगी व्यक्तीच्या नावे आहे. त्याने ओरिएन्टल बँक आॅफ कॉमर्समध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रकमेची उलाढाल केली आहे.
बजाज दाम्पत्याविरुद्ध ४,१०० पानांचे आरोपपत्र
By admin | Published: February 09, 2016 2:31 AM