शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

२११ ठिकाणी ४१३ विसर्जन तलाव; नागपुरात बाप्पांच्या निरोपाची तयारी पूर्ण

By मंगेश व्यवहारे | Published: September 27, 2023 7:49 PM

गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला श्रीगणेशाचे विसर्जन होणार आहे.

नागपूर : गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला श्रीगणेशाचे विसर्जन होणार आहे. नागपूरकरांनी स्थापना केलेल्या लाडक्या बाप्पांच्या निरोपाची मनपाद्वारे तयारी पूर्ण झालेली आहे. शहरातील दहाही झोनमधील वेगवेगळ्या २११ विसर्जनस्थळी एकूण ४१३ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आलेली असून यामध्ये १९ फिरत्या विसर्जन तलावांचा देखील समावेश आहे. ४ फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कोराडी येथील विशाल कृत्रिम तलावामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील सर्व तलावांमध्ये विसर्जनाला पूर्णत: बंदी करण्यात आली आहे. विसर्जनासाठी मनपातर्फे शहरातील प्रमुख तलावांचे परिसर तसेच अन्य ठिकाणी एकूण ४१३ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील फुटाळा तलाव, अंबाझरी तलाव, सोनेगाव तलाव, गांधीसागर तलाव, पोलिस लाईन टाकळी तलाव, सक्करदरा तलाव, नाईक तलाव या तलावांच्या परिसरामध्ये विसर्जन टँक उभारण्यात येत आहेत. या विसर्जन टँकमध्ये ४ फुट किंवा त्यापेक्षा कमी आकाराच्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. सर्व विसर्जन स्थळी निर्माल्य संकलनासाठी देखील विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागरिकांनी श्रीगणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी त्यांचे निर्माल्य काढून ते निर्माल्य कलशामध्ये जमा करावे, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.

 आयुक्तांनी दिले निर्देशमनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व विसर्जनस्थळी आवश्यक त्या सर्व सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. कृत्रिम टँकमध्ये वापरले जाणारे पाणी तसेच विसर्जीत मूर्तींची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावली जाईल, याची काळजी घेण्यात यावी, सर्व विसर्जन स्थळी निर्माल्य कलशांची व्यवस्था तसेच परिसरात नियमित स्वच्छता राखली जावी यादृष्टीने स्वच्छता कर्मचा-यांची नेमणूक करण्याचे त्यांनी निर्देशित केले. फुटाळ्यावर ग्रीन व्हिजीलचे ९ वर्षांपासून सहकार्यमनपाच्या या कार्यात शहरातील स्वयंसेवी संस्थांचे देखील सहकार्य मिळते. फुटाळा तलाव परिसरात विसर्जनस्थळी मागील ९ वर्षांपासून ग्रीन व्हिजील फाउंडेशनद्वारे मनपाला सहकार्य केले जात आहे. यावर्षीही ग्रीन व्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैसवाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, शीतल चौधरी, श्रीया जोगे, तुषार देशमुख, संस्कार माहेश्वरी, मिताली पांडे, आदर्श सिन्हा, प्रतीक्षा मेथी, कृष्णा चितलांगे, अनुज श्रीवास्तव, प्रियांशी आचार्य, वरुण मंत्री, अर्णव डेकाटे, राहुल मिश्रा, अंकित भड आदी सहकार्य करीत आहेत.

 

टॅग्स :nagpurनागपूरGaneshotsavगणेशोत्सव