शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

देशात सीजीएसटी खात्यात ४२,२४६ पदे रिक्त!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 11:02 AM

Nagpur News केंद्र सरकारने देशात वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) लागू केल्यानंतर केंद्रीय जीएसटी आणि कस्टम विभागात कनिष्ठापासून वरिष्ठांपर्यंत तर मुख्य आयुक्त, प्रधान आयुक्त आणि आयुक्तांची पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देविभागाकडून पदभरतीसाठी पुढाकार नाही कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण

मोरेश्वर मानापुरे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारने देशात वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) लागू केल्यानंतर केंद्रीय जीएसटी आणि कस्टम विभागात कनिष्ठापासून वरिष्ठांपर्यंत तर मुख्य आयुक्त, प्रधान आयुक्त आणि आयुक्तांची पदे रिक्त आहेत. गेल्या वर्षी रिक्त पदांची ३७ हजार असलेली संख्या आता ४२,२४६ वर गेली आहे. अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर रिक्त पदे भरण्यासाठी विभागातर्फे कुठलाही पुढाकार घेण्यात येत नाही. संपूर्ण देशात सीजीएसटी विभागात ९१,७०० पदे मंजूर आहेत, हे विशेष.

रिक्त पदांची माहिती मानव संसाधन विकास महासंचालनालयाने विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कस्टम, सेंट्रल एक्साईज अ‍ॅण्ड जीएसटी एससी, एसटी एम्प्लॉईज वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष संजय थूल म्हणाले, रिक्त जागा भरण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीमारामन आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व कस्टम बोर्डाकडे पत्र पाठविले आहे. सध्या अनेक कार्यालयात दोन पदाचा कार्यभार एकाच अधिकाऱ्यावर आहे. काही चूक झाल्यास चार्जशीट देऊन कारवाई करण्यात येते. कामाच्या वाढत्या तणावामुळे अनेकांनी स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग निवडला आहे.

देशात ए वर्गातील राजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये ६,३८१ पदांपैकी २,८७५ पदे तर, बी वर्गातील राजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये २२,२१७ मंजूर पदांपैकी ४,५७७ पदे रिक्त आहेत. विभागात अधिकारीचे नव्हे तर कर्मचाऱ्यांवरही कामाचा जास्त ताण येत आहे. यातच मुख्य आयुक्त, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त आणि सहायक आयुक्तांची अनेक पदे रिक्त आहेत.

महाराष्ट्रात ८,४५१ तर नागपूर झोनमध्ये ७१३ पदे रिक्त

केंद्रीय नागपूर सीजीएसटी विभागाच्या कार्यक्षेत्रात नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक विभाग येतो. नागपूर झोनमध्ये जीएसटी व कस्टम विभागात एकूण ७१३ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्राची आकडेवारी पाहिल्यास जीएसटी विभागात मुंबई झोनमध्ये ५,७७३ मंजूर पदांच्या तुलनेत ३,०६२ कार्यरत तर २,६९१ पदे रिक्त आहेत. याशिवाय नागपूर झोनमध्ये १४९२ मंजूर पदांच्या तुलनेत ८७७ कार्यरत व ६१५ पदे रिक्त, पुणे झोनमध्ये २,०६९ पदे मंजूर तर १२०० पदे रिक्त आणि ८६९ पदे रिक्त आहेत. उपरोक्त आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण ९,३३४ मंजूर पदांच्या तुलनेत ५,१५९ कार्यरत तर ४,१७५ पदे रिक्त आहेत. याशिवाय कस्टम विभागात मुंबई-१ मध्ये १८७९ मंजूर पदांच्या तुलनेत ८९९ कार्यरत पदांच्या तुलनेत ९७१ रिक्त, मुंबई-२ मध्ये २,६९९ मंजूर पदांच्या तुलनेत १२५० कार्यरत व १४२९ रिक्त, मुंबई-३ मध्ये २,९५८ मंजूर पदांच्या तुलनेत १५३१ कार्यरत व १४२७ रिक्त, पुणे येथे ७८८ मंजूर पदांच्या तुलनेत ४३२ कार्यरत व ३५१ पदे रिक्त आणि नागपुरात २१७ मंजूर पदांच्या तुलनेत ११९ कार्यरत तर ९८ पदे रिक्त आहेत. याची एकूण आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्रात जीएसटी आणि कस्टम विभागात १७,८४१ मंजूर पदांपैकी ९,३९० पदांवर अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, तब्बल ८,४५१ पदे रिक्त आहेत.

देशात मंजूर, कार्यरत व रिक्त पदांची संख्या

वर्ग मंजूर पदे कार्यरत रिक्त

ए ६,३८१ ३,५०६ २,८७५

बी २२,२१७ १७,६४० ४,५७७

(राजपत्रित)

बी ३२,३६२ १५,६१० १६,७५२

(अराजपत्रित)

सी ३०,७४० १२,६९८ १८,०४२

एकूण ९१,७०० ४९,४५४ ४२,२४६

अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला

अपुरे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बळावर काम कसे करायचे, हा गंभीर प्रश्न आहे. रिक्त पदाची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यानंतरही संबंधित विभाग भरतीसाठी कुठलेही पाऊल उचलत नाही. युवक-युवतींना रोजगार संधी देण्यासाठी विभागाने तातडीने पदभरती करावी.

संजय थूल, अध्यक्ष, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कस्टम, सेंट्रल एक्साईज अ‍ॅण्ड जीएसटी एससी, एसटी एम्प्लॉईज वेलफेअर ऑर्गनायझेशन.

टॅग्स :jobनोकरी