वाडी : नागपूर (ग्रामीण) तालुक्यात एकूण ११ ग्रामपंचायतींची सर्वत्रिक निवडणूक हाेत आहे. त्यासाठी एकूण ४२७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात अले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (बुधवार, दि. ३०) तहसील कार्यालयाच्या आवारात उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी माेठी गर्दी केली हाेती.
या ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान हाेणार आहे. त्यात ७३,७४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बहादुरा येथे १७ जागांसाठी (सहा प्रभाग) ६६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, बाेथली येथे १५ जागांसाठी (पाच प्रभाग) ४३, लिंगा येथे ११ जागांसाठी (चार प्रभाग) ३४, डाेंगरगाव येथे ९ जागांसाठी (तीन प्रभाग) २७, दवलामेटी येथे १७ जागांसाठी (सहा प्रभाग) ८१, द्रुगधामना येथे ९ जागांसाठी (तीन प्रभाग) २९, कापसी (खुर्द) येथे ११ जागांसाठी (चार प्रभाग) ३०, पांजरी (बु.) येथे ११ जागांसाठी (चार प्रभाग) ३०, पेठ कालडाेंगरी येथे ९ जागांसाठी (तीन प्रभाग) ४०, साेनेगाव (निपाणी) येथे १७ जागांसाठी (सहा प्रभाग) २५, सुराबर्डी येथे ९ जागांसाठी (तीन प्रभाग) २२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तहसील कार्यालयाच्या आवारात काेराेना उपाययाेजनांचा फज्जा उडाल्याचेही दिसून आले.