शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

नागपुरात पाच वर्षात आगीसह दुर्घटनात ४२८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 9:23 PM

अग्निशमन विभागाला मागील पाच वर्षात तीन हजारांवर इमरजन्सी कॉल्स प्राप्त झाले. यात शहरात आगी, विहीर व तलावातील दुर्घटनांचा समावेश असून ४२८ लोकांचे बळी गेले. मृतात १०४ महिला ३२४ पुरुषांचा समावेश आहे.

ठळक मुद्देवर्षभरात आगीमुळे ४१.२४ कोटींचे नुकसान : १४६.९४ कोटींची मालमत्ता वाचविली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अग्निशमन विभागाला मागील पाच वर्षात तीन हजारांवर इमरजन्सी कॉल्स प्राप्त झाले. यात शहरात आगी, विहीर व तलावातील दुर्घटनांचा समावेश असून ४२८ लोकांचे बळी गेले. मृतात १०४ महिला ३२४ पुरुषांचा समावेश आहे.गेल्या वर्षभरात नागपूर शहरात लहानमोठ्या १३६० तर शहराबाहेर ४४ आगीच्या घटना घडल्या. शहरातील आगीच्या घटनात १८ कोटी ५७ लाख ३५ हजारांचे नुकसान झाले. तर ग्रामीण भागातील आगीच्या घटनात २२ कोटी ६७ लाख २१ हजार १५० रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांना शहर व ग्र्रामीण भागात आगीपासून १४६ कोटी ९४ लाखांची मालमत्ता आगीपासून वाचविण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.१४ एप्रिलला अग्निशमन सेवा दिवसाला देशभरात अग्निशमन विभागातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. यानिमित्ताने महापालिका मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सप्ताह पाळला जाणार आहे. असल्याची माहिती उचके यांनी दिली.३१७३ दूषित विहिरींचा उपसाअग्निशमन विभागाच्या जवानांना गेल्या वर्षभरात शहरातील ३१७३ दूषित पाणी असलेल्या विहिरींचा उपसा केला. यात महापालिकेला प्राप्त झालेल्या अर्जानुसार २९७७ तर शुल्क आकारून १९६ विहिरीतील पाण्याचा उपसा करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.जीएसटी व नोटाबंदीचा फटकानोटाबंदी व जीएसटीमुळे अग्निशमन विभागाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. ४ ते ५ कोटींचे उत्पन्न गेल्या वर्षात १.७४ कोटींवर आले आहे. इमारतीसाठी नाहरकत प्रमाणपत्र, खासगी विहिरींची सफाई, पाणीपुरवठा अशा माध्यमातून विभागाला उत्पन्न प्राप्त होते.आठ स्टेशन अन् १५६ कर्मचारीमहापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या मुख्यालयासह आठ स्टेशन कार्यरत आहेत. परंतु विभागात विविध पदावर १५६ कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. विभागात २१ फायर टेंडर, २ वॉटर टेंडर, ४२ मीटर उंच टर्न टेबल लॅडर, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म, फोम टेंडर, इमरजन्सी टेंडर, यासह विविध वाहनांचा ताफा विभागाकडे आहे. मात्र मनुष्यबळाची कमतरता असल्याने विभागाला अडचणींचा सामना करावा लागतो.जनजागृती व मॉक ड्रीलप्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे अग्निसुरक्षा अभियानांतर्गत १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत ८१ उपक्रम राबविण्यात आले. यात शाळा, महाविद्यालय, रुग्णालय इमारती, शासकीय व निमशासकीय इमारती आदी ठिकाणी जनजागृती व मॉक ड्रील करण्यात आली. प्रशिक्षणात २१ हजार ११२ नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.पाच वर्षांत ४,५९८ घटनागेल्या पाच वर्षांत शहर व ग्रामीण भागात ४,५९८ आगीच्या घटना घडल्या. यात २०१३-१४ या वर्षात ७१४, २०१४-१५ या वर्षात ८३४, २०१५-१६ या वर्षात ९२२, २०१६-१७ या वर्षात ११२४ तर २०१७-१८ या वर्षात १३६० आगीच्या घटना घडल्याची माहिती राजेंद्र उचके यांनी दिली.

टॅग्स :fireआगNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका