शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

जीएसटी अनुदानात ४३ कोटींची कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 9:17 PM

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यात महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता करवसुली, नगररचना विभागाकडून होणारी शुल्क वसुली व पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाला आहे. त्यातच राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या जीएसटी अनुदानात ४७ टक्के कपात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यात महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता करवसुली, नगररचना विभागाकडून होणारी शुल्क वसुली व पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाला आहे. त्यातच राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या जीएसटी अनुदानात ४७ टक्के कपात केली आहे. दर महिन्याला ९३.३४ कोटी जीएसटी अनुदान मिळते. एप्रिल महिन्याचे अनुदानाचे ५० कोटी मे महिन्यात प्राप्त झाले. यामुळे मनपाच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.राज्यात युती सरकार सत्तेत असताना नागपूर महापालिकेला अनुदान वाटपात झुकते माप मिळाले होते. जीएसटी अनुदान ५३ कोटीवरून ९३.३४ कोटी करण्यात आले. तसेच राज्य शासनाकडे मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेले ३०० कोटींचे विशेष अनुदान प्राप्त झाले होते. यामुळे बिकट आर्थिक परिस्थितीतून सावरण्याला मदत झाली होती. परंतु राज्यातील सत्ताबदलाचा परिणाम महापालिकेला मिळणाऱ्या अनुदानावर झाला आहे. त्यात जीएसटी अनुदानात केलेली कपात कायम ठेवली तर महापालिकेपुढे गंभीर आर्थिक संकट उभे ठाकणार आहे.मनपाचा दर महिन्याचा आस्थापना खर्च १०० कोटीहून अधिक आहे. लॉकडाऊनमुळे तिजोरीत जमा होणारा महसूल घटला आहे. त्यात जीएसटी अनुदानात तब्बल ४३ कोटींनी कपात केल्याने आवश्यक खर्च वगळता कोणत्याही स्वरूपाची विकासकामे करणे शक्य होणार नाही. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तवली.मार्च महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत १५४ कोटी जमा झाले होते. तर एप्रिल महिन्यात ११८ कोटी आले आहेत. विशेष म्हणजे आर्थिक वर्ष संपल्याने यात ६१.२५ कोटीच्या शासन अनुदानाचा समावेश होता. जीएसटी अनुदानात राज्य सरकारने वाढ न केल्यास महापालिकेला विकासकामांसाठी निधी उपलब्ध करणे शक्य होणार नाही. याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होईल, अशी शक्यता अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.मार्चच्या तुलनेत एप्रिलच्या उत्पन्नात घटमहापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असलेला मालमत्ता कर, नगररचना विभाग व पाणीपट्टी वसुलीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक घरात असल्याने वसुलीवर परिणाम झाला आहे. मार्चच्या सुरुवातीला कार्यालये सुरू होती. कर वसुलीतून ३२.२६ कोटी, पाणी करातून १२.२४ कोटी तर नगररचना विभागाची ५.६५ कोटीची वसुली झाली. मात्र एप्रिल महिन्यात करवसुली ४.७३ कोटी, पाणीकर २.०८ कोटी, नगररचना ३४ लाख वसुली झाली.

मुख्यमंत्र्यांकडे अनुदानाची मागणी करणारराज्य सरकारकडून महापालिकेला २९९.७० कोटींचे अनुदान अप्राप्त आहे. तसेच एप्रिल महिन्याच्या जीएसटी अनुदानात ४३ कोटींनी कपात केली आहे. याचा फटका शहरातील विकासकामांना बसणार असल्याने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन अप्राप्त अनुदान व जीएसटी अनुदानाची मागणी करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली.

टॅग्स :GSTजीएसटीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका