लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामातील कापूस पिकांवर बोंडअळी व धानपिकावरील तुडतुडा किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. त्यानुसार नागपूर विभागातील ४ लाख ९९ हजार ७१५ बाधित शेतकऱ्यांना ४३४ कोटी ११ लक्ष ८५ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप पूर्ण झाले आहे.खरीप हंंगाम २०१७ मध्ये कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. तसेच पूर्व विदर्भातील धान उत्पादक क्षेत्रात तुडतुडा किडीच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत जाहीर केली होती. त्यानुसार शासनाकडून तीन हप्त्यात मदत प्राप्त झाली होती. ती महसूल विभागातर्फे शेतकऱ्यांना जिल्हानिहाय वाटप करण्यात येऊन प्रत्यक्ष वितरित करण्यात आली. तसेच तिसऱ्या टप्प्यातील मदतीचे वाटपसुद्धा सुरू आहे.कापूस पिकावरील बोंडअळी व धानपिकावर झालेल्या तुडतुडा किडीच्या नुकसानीसंदर्भात झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणानुसार जिल्हानिहाय शासनाकडे ५३७ कोटी ६६ लाख २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार संपूर्ण निधी प्राप्त झाला आहे आणि त्यानुसार मदतीचे वाटप अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत ८० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप पूर्ण झाले आहे.शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीपोटी मदतीसाठी नागपूर जिल्ह्यातील ८५ हजार २६० शेतकऱ्यांना ४६ कोटी ८३ लक्ष रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार १४९ शेतकऱ्यांना १०२ कोटी ५२ लाख रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ४२४ शेतकऱ्यांना ३७ कोटी २७ लक्ष ७६ हजार, चंद्रपूर जिल्ह्यातील ८६ हजार ३६५ शेतकऱ्यांना १४९ कोटी ९७ लक्ष ७८ हजार, भंडारा जिल्ह्यातील ६३ हजार ५४७ शेतकरी सभासदांना ६५ कोटी ४३ लक्ष ९५ हजार तर गडचिरोली जिल्ह्यातील १९ हजार ९७० शेतकरी सभासदांना ३२ कोटी ७ लक्ष रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे.
बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना ४३४.११ कोटी रुपयांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 11:22 PM
खरीप हंगामातील कापूस पिकांवर बोंडअळी व धानपिकावरील तुडतुडा किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. त्यानुसार नागपूर विभागातील ४ लाख ९९ हजार ७१५ बाधित शेतकऱ्यांना ४३४ कोटी ११ लक्ष ८५ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप पूर्ण झाले आहे.
ठळक मुद्दे४ लाख ९९ हजार ७१५ बाधित शेतकऱ्यांचा समावेश