शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

४४० डॉक्टर निलंबित

By admin | Published: March 23, 2017 2:01 AM

सुरक्षेच्या मुद्याला घेऊन सोमवारपासून सामूहिक रजेवर गेलेल्या ४४० निवासी डॉक्टरांवर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

मेयो, मेडिकलची रुग्णसेवा आॅक्सिजनवर : सामान्य नागरिकांना फटका नागपूर : सुरक्षेच्या मुद्याला घेऊन सोमवारपासून सामूहिक रजेवर गेलेल्या ४४० निवासी डॉक्टरांवर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. यात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) १३० तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ३१० निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. या कारवाईचा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेने निषेध करीत दुपारपासून त्यांनीही संपात उडी घेतली. परिणामी, उपराजधानीची आरोग्य व्यवस्था प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गरीब रु ग्ण झाला रडवेला मेयो, मेडिकलमधील निवासी डॉक्टर तिसऱ्या दिवशी, बुधवारी सामूहिक रजेवर होते. परिणामी, रुग्णांच्या गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या या दोन्ही रुग्णालयांमध्ये योग्य उपचार मिळत नसल्याने गरीब रु ग्ण रडवेला झाला आहे. उपचारासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. एका वरिष्ठ डॉक्टरांकडे तीन-तीन वॉर्डाची जबाबदारी आल्याने तारांबळ उडत आहे. वॉर्डात भरती रुग्णांवर अर्धवट उपचार करून सुटी दिली जात आहे. केवळ ‘राऊंड’ पुरतेच वरिष्ठ डॉक्टर निवासी डॉक्टर सोमवारपासून सामूहिक रजेवर गेल्याने यांची जबाबदारी वरिष्ठ डॉक्टरांवर आली आहे. परंतु या दोन्ही रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, आकस्मिक विभाग, अतिदक्षता विभाग सोडल्यास दुपारनंतर कुठेच वरिष्ठ डॉक्टर दिसून येत नसल्याचे चित्र आहे. रुग्णाच्या मते वरिष्ठ डॉक्टर दिवसातून केवळ दोन वेळा राऊंड घेतात. त्यानंतर वॉर्डात ‘इंटर्न’ व परिचारिकाच असतात. विशेष म्हणजे इतर दिवशी ३०० वर रुग्णांना भरती केले जात होते तो आकडा बुधवारी केवळ १०० वर आला आहे. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असून आपत्कालीन स्थितीत येणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहे. २४ तासांत १४ मृत्यू मेडिकलमध्ये इतर दिवसांमध्ये २४ तासांत सात-आठ रुग्णांचा मृत्यू होतो. परंतु निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेल्यापासून म्हणजे सोमवार सकाळी ८ ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला कोण जबाबदार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागासमोर (ओपीडी) बुधवारी रुग्णांची लांबच लांब रांग लागली होती. निवासी डॉक्टर गैरहजर असल्याने वरिष्ठ डॉक्टर आपली सेवा देत होते. परंतु रुग्णांच्या संख्येत त्यांची तोकडी संख्या होती. परिणामी, उपचारात वेळ लागत असल्याने रुग्णांच्या गर्दीत भर पडत होती. विशेष म्हणजे, ‘ओपीडी’ व वॉर्डात मेडिकलच्या ‘नॉन क्लिनीकल’ डॉक्टरांची ड्युटी लावण्यात आलेल्या नाही. यामुळे रुग्णांचा भार कार्यरत डॉक्टरांवर वाढला असून गोंधळ उडत असल्याचे खुद्द डॉक्टरांचे म्हणणे आहे.