नागपूर: मागील काही दिवसांपासून नागपूर विभागाच्या तुलनेत अमरावती विभागात कोरोनाबाधितांची संख्या अधिक राहत होती; परंतु शनिवारी पहिल्यांदाच अमरावती विभागातील जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्या संख्या ५००वर गेली नाही. मात्र, नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यासह वर्धा व आता चंद्रपूरमध्ये रुग्ण वाढताना दिसून येत आहेत.शनिवारी विदर्भात ४४३७ नव्या रुग्णांची भर पडली तर, २७ मृत्यूंची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात आज या वर्षीचा रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. २२६१ नवे रुग्ण आढळले व ७ रुग्णांचे बळी गेले. नागपूरनंतर सर्वाधिक नोंद अकोला जिल्ह्यात झाली. ४७३ रुग्ण व ३ मृत्यू झाले. अमरावती जिल्ह्यात ३८४ रुग्ण व ७ मृत्यू, बुलडाणा जिल्ह्यात ३६२ रुग्ण, यवतमाळ जिल्ह्यात ३४६ रुग्ण व २ मृत्यू, वर्धा जिल्ह्यात २३४ रुग्ण व ७ मृत्यू, वाशिम जिल्ह्यात १५५ रुग्ण तर चंद्रपूर जिल्ह्यात १०४ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
जिल्हा रुग्ण ए. रुग्ण मृत्यूनागपूर २२६१ १६८२५० ०७वर्धा २३४ १४६३२ ०७गोंदिया १५ १४६८१ ००भंडारा ६५ १४२५८ ००चंद्रपूर १०४ २४६६० ००गडचिरोली ३८ ९८५५ ००अमरावती ३८४ ३६४७८ ०७वाशिम १५५ ११०५९ ००बुलढाणा ३६२ २४४६९ ००यवतमाळ ३४६ २१२६५ ०३अकोला ४७३ २१०६२ ०३