लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेला प्रादेशिक मनोरुग्णालयातील एका मनोरुग्णाचा रविवार २० मे रोजी मृत्यू झाला. १६ दिवसांत मनोरुग्णालयाच्या पाच रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या संचालकांनी याबाबत सविस्तर अहवाल मागितल्याची माहिती आहे.प्रादेशिक मनोरुग्णालयातील दोन रुग्णांच्या हत्याप्रकरणात अद्याप कुणावरही कारवाई का झाली नाही. यातच प्रादेशिकमनोरुग्णालयात ४ मेपासून मृत्यूचे लागोपाठ सत्र सुरू असल्याने रुग्णालयाच्या कामकाजावरच शंका उपस्थित केली जात आहे. सूत्रानुसार, ४ मे रोजी लक्ष्मी (२२) नावाच्या अनोळखी मनोरुग्ण महिलेचा, ५ मे रोजी मनोज बुराडे (२५), ६ा मे रोजी पहाटे माधुरी महाल्ले (३०), सोमवार ७ मे रोजी मंदा ताडाम (३५) तर २० मे रोजी २५ वर्षीय सचिन नावाच्या तरुणाचा मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. लागोपाठ मृत्यूची मालिकेची दखल आरोग्य विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी घेतल्याची माहिती आहे. त्यांनी याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे बोलले जात आहे. सचिनचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाच महिन्यांत १६ मृत्यूनवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच मनोरुग्ण व कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. जानेवारी ते फेबु्रवारी या दोन महिन्यातच सात मनोरुग्णांचा तर पाच कर्मचाºयांचा मृत्यू झाला. मे महिन्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला.
नागपुरात १६ दिवसांत ५ मनोरुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:11 AM
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेला प्रादेशिक मनोरुग्णालयातील एका मनोरुग्णाचा रविवार २० मे रोजी मृत्यू झाला. १६ दिवसांत मनोरुग्णालयाच्या पाच रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या संचालकांनी याबाबत सविस्तर अहवाल मागितल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालय : रविवारी आणखी एका रुग्णाची नोंद