शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
3
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
4
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
5
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
6
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
7
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
8
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
9
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
11
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
12
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
13
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
14
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
15
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
16
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
17
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
18
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
19
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
20
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

व्हेरिफिकेशनअभावी अडकले ५ हजार पासपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 4:54 PM

टीसीएसचे सॉफ्टवेअर बनले डोकेदुखी: पोलिसांना मिळत नाही माहिती, नागरिकांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नॉर्मल पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांच्या कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पासपोर्ट ऑफिसकडून ते पडताळणीसाठी पोलिसांकडे पाठविले जातात. मात्र, अर्ज करणाऱ्यांची माहिती पोलिसांना मिळेनासी झाल्याने नागपूर विभागाच्या पासपोर्ट कार्यालयांतर्गत गेल्या दीड महिन्यात सुमारे ५ हजार पासपोर्ट अडकून पडले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक काम असूनही संबंधित नागरिक विदेशवारीपासून वंचित झाले आहेत. 

या समस्येचे मूळ कारण टीसीएस कंपनीचे नवीन सॉफ्टवेअर आहे.त्यामुळेच नागरिकांना त्रास होत आहे. पासपोर्ट सेवा कार्यक्रम अपग्रेड करण्यात आला असून, पायलट प्रोजेक्ट अंतर्गत नागपूर आणि भूवनेश्वरमध्ये १ एप्रिल २०२४ पासून तो सुरू करण्यात आला आहे.

सॉफ्टवेअर इंटरफेसच्या डेव्हलपमेंट आणि फंक्शनिंगची जबाबदारी टीसीएसकडे आहे. मात्र, जे सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यात आले ते व्यवस्थित चालत नाही. योग्य प्रकारे टेस्ट न करताच ऑनलाइन करण्यात आले. त्यामुळे सुरुवातीपासूनच यात तांत्रिक अडचणी येत आहेत. ५ हजार अर्जदारांचे नॉर्मल पासपोर्ट अडकून पडले आहेत. सर्वांत मोठी तांत्रिक अडचण पोलिस व्हेरिफिकेशनमध्ये येत आहे. कारण पासपोर्ट ऑफिसकडून पाठविण्यात आलेली माहितीच पोलिसांना मिळत नाही.

एमपोलिस अॅपमध्ये दिसतच नाही डाटापासपोर्ट ऑफिसमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननंतर पोलिस व्हेरिफिकेशनसाठी रिक्वेस्ट जाते, ती पोलिसांना त्यांच्या एमपोलिस अॅपमध्ये दिसतच नाही. पोलिसांकडून पडताळणी अहवाल मिळाल्यानंतरच पासपोर्ट मंजूर होऊन प्रिटसाठी जातो. मात्र, १ एप्रिलपासून नवीन सॉफ्टवेअर कार्यान्वित झाल्यानंतर पोलिसांना त्यांच्या अॅपवर डाटा मिळत नसल्याने पोलिस व्हेरिफिकेशन अडून पडले आहेत. परिणामी, पासपोर्ट बनणे बंद आहे. मात्र, तत्काळ पासपोर्ट बनणे सुरू आहे. कारण यात पासपोर्ट बनविल्यानंतर व्हेरिफिकेशन केले जाते. मात्र, त्याचा कोटा नॉर्मलच्या तुलनेत खूप कमी आहे.

रद्द करावी लागत आहे हॉलिडे बुकिंगअनेकांनी उन्हाळ्यात विदेशात हॉलिडे बुकिंग करून ठेवली आहे. मात्र, पासपोर्ट मिळत नसल्याने त्यांना बुकिंग कॅन्सल करावी लागत आहे. आधी नॉर्मल पासपोर्ट २१ दिवसात मिळत होता. मात्र, आता दीड महिना होऊनही मिळेनासा झाला आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे, व्यापारी आणि ऑफिस दूरसाठी जाणाऱ्यांना या समस्येचा फटका बसत आहे. अडचण घेऊन पोहोचणारांना पासपोर्ट ऑफिसमधून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

अनेकांचे टूर अधांतरीयुरोपमधील काही देशांसह न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात वैध पासपोर्टसह पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटचीही (पीसीसी) आवश्यकता असते. पीसीसी प्रकरणात पोलिसांना आवेदकांचा डाटाच दिसून येत नसल्याने तेसुद्धा अडकून पडले आहेत. परिणामी अनेकांचे टूर अधांतरी आहेत.

टीसीएसने साधले मौनया संबंधाने पासपोर्ट सेवा केंद्र नागपूरचे टीसीएस हेड प्रदीप्ता डे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले की यासंबंधाने तुम्ही क्षेत्रिय पासपोर्ट ऑफिससोबत संपर्क करा. तर, पासपोर्ट अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी समस्या मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच ही अडचण दूर होणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :passportपासपोर्टTataटाटाnagpurनागपूर