महापालिका : शासनाला प्रस्ताव पाठविणारनागपूर : शहरातील प्रमुख बाजारपेठात प्रसाधनगृहांची सुविधा नसल्याने महिलांची कुचंबणा होते. ही बाब विचारात घेता महापालिका अशा भागात ५० प्रसाधनगृह उभारणार आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. शहरातील प्रसाधनगृहांच्या दुरवस्थेचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. शहराच्या विस्तारासोबत लोकसंख्या वाढत असल्याने बाजारपेठात ग्राहकांची गर्दी होत आहे. परंतु प्रसाधनगृहांची सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होते. मागील काही वर्षांत त्यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न झालेले नाही. दुसरीकडे अस्तित्वातील प्रसाधनगृहांची अवस्था चांगली नसल्याने त्याचा वापर होत नसल्याचे चित्र आहे. सध्या शहरात ८८ प्रसाधनगृहे तर १६७ स्वच्छतागृहे आहेत. यातील अनेक वापरात नाही. तसेच काही ठिकाणी असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. काही शौचालये व प्रसाधनगृहांचे नूतनीकरण होण्याची गरज आहे. निकड असलेल्या काही जुन्यांची दुरुस्ती व प्रस्तावित प्रसाधनगृहांसाठी मनपा निधी उपलब्ध करणार आहे. (प्रतिनिधी)अशा आहेत बाजारपेठाशहरात सीताबर्डी, महाल, सदर येथील प्रमुख बाजारपेठांसोबतच बुधवारी बाजारपेठ, दहीबाजार, आशीर्वादनगर, आदी ठिकाणी लोकांची गर्दी असते. परंतु काही अपवाद वगळता प्रसाधनगृहांची सुविधा नाही. त्यामुळे महिलांची कु चंबणा होते. मनपा प्रशासन त्यादृष्टीने कामाला लागले आहे. ५० प्रसाधनगृहांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.
शहरात ५० प्रसाधनगृह उभारणार
By admin | Published: April 07, 2015 2:13 AM