शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
4
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
5
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
6
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
7
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
8
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
9
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
10
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह उमेदवार रंगले ऐसपैस गप्पांमध्ये
13
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
14
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
15
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
16
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
17
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
18
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
19
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
20
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!

नागपुरात  कुरिअर बॉयजवळ आढळले सोन्याचे ५० लाखांचे दागीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 9:20 PM

शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने आणि आयकर विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमधील एका कुरियर बॉयजवळ ५० लाखाचे दागिने आढळले.

ठळक मुद्देआरपीएफ, आयकर विभागाची कारवाई : मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमधील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेने आणि आयकर विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमधील एका कुरियर बॉयजवळ ५० लाखाचे दागिने आढळले.रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेला आणि आयकर विभागाला रेल्वेगाडी क्रमांक १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसमधून सोन्याच्या दागिन्यांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरपीएफच्या गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवराम सिंह प्लॅटफार्म क्रमांक ८ वर पोहोचले. त्यांना आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल शशिकांत गजभिये, राम यादव आणि आयकर विभागाचे अतुल आहुजा आणि त्यांची चमू तेथे आढळली. दुरांतो एक्स्प्रेस सकाळी ७.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ८ वर आली. त्यानंतर त्यांनी संयुक्तरीत्या दुरांतो एक्स्प्रेसची तपासणी सुरू केली. यात एस ३ कोचमध्ये त्यांना एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत आढळली. चौकशीत त्याने आपले नाव बालू (५०) रा. अकोला असे सांगितले. आपण कुरिअर बॉय असून जवळ ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे १.८८७ किलोचे दागिने असल्याची माहिती दिली. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.दागिन्यांचे कागदपत्र योग्यआयकर विभागाचे संचालक (अन्वेषण) जय काजला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आयकर विभागाने जप्त केलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे बिल संबंधीत व्यक्तीने दाखविले असून ते योग्य असल्याची माहिती दिली. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल होणार नसून कागदोपत्री कारवाईनंतर हे दागिने परत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :railwayरेल्वेGoldसोनं