लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागातील शेतकरी आत्महत्येची समस्या अद्यापही कायम आहे. विभागात मागील पाच वर्षांत सोळाशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मागील वर्षभरातील आत्महत्यांचा आकडा २४८ इतका होता. तर यातील अवघ्या ५० टक्के शेतकऱ्यांचे कुटुंबीयच मदतीसाठी पात्र ठरले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकाराअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती. वर्ष २००१ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपूर विभागात किती शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली व किती प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपूर जिल्ह्यात २४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तेवढे अर्ज मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. यातील केवळ १२४ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली तर तब्बल २९ टक्के म्हणजेच ९७ प्रकरणे अपात्र ठरली. २७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. पात्र कुटुंबीयांना एकूण १ कोटी २४ लाख रुपयांची मदत देण्यात आली.१८ वर्षात चार हजारांहून अधिक आत्महत्याप्राप्त झालेल्या माहितीनुसार २००१ ते २०१८ या १८ वर्षांच्या कालावधीत नागपूर विभागात तब्बल ४ हजार ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील २ हजार ४५ म्हणजेच २२० म्हणजेच ५१ टक्के प्रकरणे मदतीसाठी प्राप्त ठरली. तर १ हजार ९३५प्रकरणांना अपात्र ठरविण्यात आले. २०१४ सालापासून विभागात १ हजार ६१२ शेतकऱ्यांनी आयुष्य संपविले. यातील ६० टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यात आली.