लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिके च्या आरोग्य विभागाकडून १७ डिसेंबरपासून कचरा विलगीकरण बंधनकारक केले आहे. निर्णयांची सक्तीने अंमलबजावणी केली जात आहे. यासोबत शहरातील मोकळ्या भूखंडावर कचरा साचून राहतो. अनेक भूखंडाच्या मालकांचा ठावठिकाणा नाही. अशा भूखंडावर कचरा आढळून आल्यास दररोज ५० हजारांचा दंड आकारला जाणार नाही. भूखंडधारकांचा शोध न लागल्यास अशा भूखंडावर महापालिका जप्तीचा फलक लावणार आहे.शहरातील तीन हजार अभिन्यासातील जवळपास एक लाख भूखंडधारकांचा ठावठिकाणा लागलेला नाही. याचा मालमत्ता कर वसुलीवर परिणाम होत आहे. अशा भूखंडावर कचरा साचलेला आढळून आल्यास आरोग्य विभागाकडून दंड आकारला जाणार आहे. तसेच दंड न भरल्यास जप्तीचे फलक लावण्यात येतील, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे यांनी दिली.मार्च महिन्यापासून शहराला दोन भागात विभाजित करून संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. कचरा संकलनाचा नवा पॅटर्न राबविला जाणार आहे. मार्चमध्ये कनकचा कंत्राट सपंत असल्याने नवीन व्यवस्था करावी लागणार आहे. याबाबतच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. कचरा संकलनासाठी नागरिकांकडून शुल्क वसूलणार आहे. मात्र सभागृहाच्या निर्णयानंतर शुल्क आकारणी केली जाणार आहे.दहा ट्रान्सफर स्टेशनशहरात निर्माण होणारा कचरा साठवून त्याचे विलगीकरण करण्यात येईल. यासाठी प्रत्येक झोनमध्ये एक असे दहा ट्रान्सफर स्टेशन राहणार आहेत. यासाठी जागा निश्चित क रण्यात आलेल्या आहेत. यात झोन क्रमांक १ मध्ये रहाटे कॉलनी चौक, झोन क्रमांक २ व १० गिट्टीखदान चौक येथील महसूल विभागाची जागा, झोन क्रमांक ६ व ८ लकडगंज झोनच्या मागील जागा, झोन क्रमांक ७ किनखेडे ले-आऊ टची जागा, झोन क्रमांक १० मेकोसाबाग, झोन क्रमांक ९ इंदोरा मैदान येथील ट्रान्सपोर्ट प्लाझा, झोन क्रमांक ६ रामझुल्याच्या खाली.सॅनेटरी इन्स्पेक्टर निलंबितसफाई कर्मचारी व सॅनेटरी इन्स्पेक्टर यांना जीपीएस घड्याळी बांधणे बंधनकारक आहे. नेहरूनगर झोनमधील सॅनेटरी इन्स्पेक्टर मदन नागपुरे हा सक्करदरा तलाव परिसरात कामावर असताना हाताला घड्याळ बांधत नसल्याचे आढळून आल्याने त्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
भूखंडावर कचरा आढळल्यास ५० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 12:04 AM
शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिके च्या आरोग्य विभागाकडून १७ डिसेंबरपासून कचरा विलगीकरण बंधनकारक केले आहे. निर्णयांची सक्तीने अंमलबजावणी केली जात आहे. यासोबत शहरातील मोकळ्या भूखंडावर कचरा साचून राहतो. अनेक भूखंडाच्या मालकांचा ठावठिकाणा नाही. अशा भूखंडावर कचरा आढळून आल्यास दररोज ५० हजारांचा दंड आकारला जाणार नाही. भूखंडधारकांचा शोध न लागल्यास अशा भूखंडावर महापालिका जप्तीचा फलक लावणार आहे.
ठळक मुद्देमालक न सापडल्यास महापालिका जप्तीचा फलक लावणार