पचखेडी : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नेहरू युवा केंद्र आणि न्यू सार्वजनिक बालगणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने पचखेडी (ता. कुही) येथे गुरुवारी (दि. ३१) रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात स्थानिक ५० तरुणांनी रक्तदान केले.
रक्तदानाचे महत्त्व, काेराेना संक्रमण काळात रक्ताची गरज व सामाजिक बांधिलकी जाेपासत या शिबिराचे आयाेजन करण्यात आल्याची माहिती आयाेजकांनी उद्घाटनप्रसंगी दिली. यावेळी माजी सरपंच दिलीप भोयर, गुणवंता लांजेवार, हरीश शेंडे, शैलेश ढोरे, गोलू शेंडे, गजानन सोनवाणे, लोकेश खराबे, बंटी कामळे, राकेश राघोर्ते, आशिष भोयर, मंगेश भोयर, विशाल राघोर्ते, निकेश मुळे, अभिमन खराबे उपस्थित होते. नागपूर येथील जीवन ज्योती ब्लड बँकेच्या चमूने रक्तसंकलनाची जबाबदारी पार पाडली.